चेअरमनपदी डॉ. यतीन जाधव

चेअरमनपदी डॉ. यतीन जाधव

Published on

- rat६p७.jpg-
२६O२२४६९
डॉ. यतीन जाधव
-----
राज्य आपत्ती व्यवस्थापन
समिती अध्यक्षपदी डॉ. जाधव
चिपळूण, ता. ६ ः चिपळूणमधील त्वचा व सौंदर्यविकार तज्ज्ञ डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.
राज्यातील डॉक्टर व रुग्णांच्या हितासाठी समिती कार्यरत असलेल्या या महत्त्वपूर्ण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांचा समावेश आहे. ही समिती महाराष्ट्र राज्यातील डॉक्टरांच्या समस्या, रुग्णांचे हित आणि विशेषतः आपत्तीकाळात वैद्यकीय सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्य करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्यासाठी लवकरच समितीची बैठक होऊन विविध योजनांची आखणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. डॉ. जाधव यांची ही निवड त्यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील दांडग्या अनुभवामुळे झाली आहे. औद्योगिक स्वास्थ्य आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांची ख्याती लक्षात घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com