जिल्हा न्यायालयात विशेष मोहिम
जिल्हा न्यायालयात विशेष मोहीम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः अखिल भारतीय पातळीवर राबवली जाणारी मेडिएशन फॉर नेशन २.० विशेष मोहीम रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात २ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. १५ मेपर्यंत न्यायालयात प्रलंबित दावे, वाद तडजोडपात्र खटले, मध्यस्थीद्वारे मिळवले जाणार आहेत.
देशभर सुरू असलेल्या या मेडिएशन फॉर नेशन २.० या विशेष मोहिमेंतर्गत वैवाहिक वाद, मोटार अपघात प्रकरण, कौटुंबिक हिंसाचार, चेक बाउंस, वाणिज्य प्रकरणे, सेवाविषयक वाद, फौजदारी प्रकरणे, ग्राहक तक्रारमंचाची प्रकरणे, कर्जवसुली, भूसंपादन, कामगार न्यायालय प्रकरणे, न्यायाधिकरण प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे अशा विविध श्रेणीतील वाद निवडून मध्यस्थी प्रक्रियेसाठी संदर्भित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांनी या अभियानात अधिकाधिक प्रकरणे मध्यस्थीद्वारे समझोत्याने मिटावीत त्याकरिता लोकांना आपले वाद मध्यस्थी केंद्राकडे पाठवावेत, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

