-नवनिर्माणच्या शिबिरात ३३१ परिचारिका सहभागी

-नवनिर्माणच्या शिबिरात ३३१ परिचारिका सहभागी

Published on

परिचारिकांसाठी एकदिवसीय शैक्षणिक शिबिर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः नवनिर्माण शिक्षणसंस्था संचलित नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग लोवले, संगमेश्वर यांच्यावतीने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘कन्टिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट’ (CPD) अंतर्गत एकदिवसीय शैक्षणिक शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. रत्नागिरीतील शिक्षणसंस्थेच्या संकुलात झालेल्या या शिबिरास जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधील ३३१ नर्सेसनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरासाठी नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करणे आणि त्यांना जन्मानंतर मिळणारी प्राथमिक काळजी अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. रत्नागिरी जिल्हा स्कूल ऑफ नर्सिंगचे बिराजदार यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून नवजात शिशूंच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपचारपद्धतींवर सखोल भाष्य केले. या व्यतिरिक्त नर्सिंग क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रा. स्नेहल खेराडे व प्रा. अमृता पाल्ये (नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग), प्रा. सुजाता महाडिक (डेरवण नर्सिंग कॉलेज), प्रा. अजित देशपांडे (MES नर्सिंग कॉलेज), प्रा. स्मिता सुर्वे (रत्नागिरी जिल्हा स्कूल ऑफ नर्सिंग) या मान्यवरांनी नवजात बालकांची काळजी, आपत्कालीन नर्सिंग सेवा आणि कौशल्य विकास यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे नर्सिंग व्यावसायिकांच्या ज्ञानात भर पडते आणि नवजात शिशूंच्या आरोग्यसेवा अधिक दर्जेदार होण्यास मदत होते, असे मत सहभागी परिचारिकांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com