डेरवण महाशस्त्रक्रीया शिबिर

डेरवण महाशस्त्रक्रीया शिबिर

Published on

डेरवण रुग्णालयात
महाशस्त्रक्रिया शिबिर
सावर्डे ः गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात १२ आणि १३ फेब्रुवारीला मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शिबिरात होणाऱ्या प्रमुख शस्त्रक्रिया सामान्य शस्त्रक्रिया-हर्निया, अॅपेंडिक्स, मूळव्याध, फिशर, हायड्रोसिल, चरबीच्या गाठी, थायरॉईड, मुतखडा, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट ग्रंथी.
कान-नाक-घसा : टॉन्सिल, कानाच्या पडद्याचे ऑपरेशन, नाकाचे हाड वाढणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि महिलांच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आणि आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. भूलतज्ज्ञांकडून रुग्णांची पूर्ण तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच शस्त्रक्रियेसाठी दाखल करून घेतले जाईल.
दोन्ही दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सचिन धुमाळ, संकेत जांभळे, संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा. गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

खेर्डीत पोलिसांचा
रूट मार्च
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांनी बहादूरशेख नाका ते खेर्डी एमआयडीसी असा रूट मार्च काढला. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व चिपळूण पोलिस ठाण्याचे ५ अधिकारी, ३० अंमलदार, आरसीपी प्लाटूनचे ३० जवान व ५६ होमगार्ड सहभागी झाले होते. तसेच रूट मार्चसाठी चार वाहनांचा वापर करण्यात आला.

नांदिवसे गणेशपूरमध्ये
जिजाऊ ब्रिगेडची शाखा
चिपळूण : नांदिवसे गणेशपूर येथे जिजाऊ ब्रिगेडची ग्रामशाखा सुरू करण्यात आली. चिपळूण तालुकाध्यक्ष मिलन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा स्थापन झाली आहे. गुरव यांनी जिजाऊ ब्रिगेड म्हणजे काय, या माध्यमातून आपण काय कामे करावीत याबाबत माहिती दिली. प्रभा शिंदे यांना जिजाऊ ब्रिगेड ग्रामशाखा अध्यक्षपद देण्यात आले. उपाध्यक्ष म्हणून योगिता पडयाळ यांची निवड करण्यात आली. या वेळी शहर उपाध्यक्ष अपूर्वा गायकवाड, कळंबस्ते ग्रामशाखा अध्यक्ष रूपाली आंबेर, अलका कदम, संगीता पवार, सकू पवार, मामी शिंदे, लिला देवरूखकर, श्वेता गोरिवले, योगिता देवरूखकर, सुनंदा देवरूखकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com