शासकीय तंत्रनिकेतनमधील विश्वेश्वरय्या उद्यानाचे नूतनीकरण
काही सुखद---लोगो
-rat६p१२.jpg-
P२६O२२४८८
रत्नागिरी ः शासकीय तंत्रनिकेतनमधील विश्वेश्वरैय्या उद्यानाचे नूतनीकरण प्राचार्य सी. वाय. सिमिकेरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
-----
तंत्रनिकेतनमधील उद्यानाचे नूतनीकरण
माजी विद्यार्थी संघटनेचा उपक्रम; विद्यार्थीहिताची १५ वर्षे, संस्थेप्रती कृतज्ञता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या ‘क्रिएटिव्ह अल्युम्नी’ या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने आता महाविद्यालयातील ‘सर विश्वेश्वरैय्या उद्याना’च्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कार्याचा प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य सी. वाय. सिमिकेरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
विद्यार्थीहिताची १५ वर्षांची परंपरा आपल्या शिक्षणसंस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘क्रिएटिव्ह अल्युम्नी’ ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. केवळ माजी विद्यार्थ्यांचा समूह न राहता त्यांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले आहेत. १० लाखांचा आरओ (रिव्हर्स ऑस्मोसिस) प्लांट आणि इतर सुविधा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून संघटनेने सुमारे १० लाख रुपये स्वखर्चाने खर्च करून तंत्रनिकेतनमध्ये अद्ययावत आरओ प्लांट आणि पाच वॉटरकूलर बसवले आहेत. याचा लाभ गेल्या तीन वर्षांपासून महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थी आणि कर्मचारी घेत आहेत. याशिवाय, खेळाडूंसाठी संस्थेने परिसरात सुसज्ज सिमेंट क्रिकेट पीचदेखील तयार करून दिले आहे. नूतनीकरणामुळे महाविद्यालय परिसराच्या सौंदर्यात अधिक भर पडणार असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक चांगले वातावरण उपलब्ध होणार आहे.--------
चौकट
१० वर्षे मोफत जेवणाची सोय
सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर माणुसकीच्या नात्याने ही संस्था गेल्या १० वर्षांपासून होतकरू विद्यार्थ्यांना मोफत जेवणाची सोय, पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करत आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृसंस्थेसाठी राबवलेल्या या उपक्रमांचे रत्नागिरी शहरासह शैक्षणिक वर्तुळात मोठे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

