राजु दिनदयाळ ठरले उत्कृष्ट समतादूत
२२५२६
राजू दिनदयाळ ठरले
उत्कृष्ट समता दूत
वैभववाडीला सन्मान : बार्टीतर्फे गौरव
तळेरे, ता. ६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या स्वायत्त संस्थाअंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत क्षेत्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या प्रकल्पात समतादूत म्हणून कार्य करणाऱ्या वैभववाडी येथील राजू दिनदयाळ यांची कोकण जिल्ह्यातील उत्कृष्ट समतादूत म्हणून बार्टीच्या वतीने निवड करण्यात आली .
राजू दिनदयाळ यांनी गाव पातळीवर जाऊन बार्टी तसेच समाज कल्याण विभागाच्या योजनांचा प्रचार केला. तालुक्यातील लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला. बार्टीच्या रायगड महाड येथील जिल्हास्तरीय कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार निवडीबद्दल बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, विभाग व्यवस्थापक सुमेध थोरात, समाज कल्याण सिंधुदुर्गचे सहायक आयुकत संतोष चिकणे, प्रकल्प अधिकारी विजय कदम यांचे दिनदयाळ यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

