राज्य नाट्य स्पर्धा

राज्य नाट्य स्पर्धा

Published on

-rat७p१.jpg-
२६O२२६४६
रत्नागिरी ः मोरया प्रतिष्ठान मुंबई या संस्थेने सादर केलेल्या ‘निर्वासित’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
---
राज्य नाट्यस्पर्धा--लोगो

कौटुंबिक वास्तव दाखवणारे नाटक ‘निर्वासित’
मोरया प्रतिष्ठानचे सादरीकरण ः कलाकारांच्या अभिनयाला दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः गावातून मुंबईत गेल्यावर बीएमसी चाळीत राहणाऱ्या माणसांचं जीवन आणि त्यांचे कौटुंबिक वास्तव कलाकरांनी अभिनयातून उभं केलं. राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत मोरया प्रतिष्ठान मुंबई या संस्थेने हा प्रयोग येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सादर केला. लेखक स्वप्नील जाधव लिखित व दिग्दर्शक महेंद्र दिवेकर यांच्या संकल्पनेतून नाटक साकार झाले. कलाकारांचा अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा असे चोहोबाजूनी रंगतदार झाले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
-------
बालपण गावात गेल्यानंतर कामानिमित्त मुंबईत गेलेल्या एका कुटुंबाची कथा ‘निर्वासित’ या नाटकातून उभी करण्यात आली आहे. हसोळकर हे पत्नी मुलगा आणि एक मुलगी अशी मुंबईतील बीएमसीच्या चाळीत राहात असतात. मुलगी दर्शनाची पहिली नोकरी कोरोना काळात कमी केल्यामुळे जाते. ती नोकरी शोधत असते. मुलगा काम करत असतो; पण कुटुंबाला त्याचा आधार नसतो. वयोपरत्वे हसोळकर यांचा निवृत्तीचा काळ येत असतो. त्यांना गावाकडची ओढ असते. नोकरीतून मुंबईत घर घेणे शक्य नसल्यामुळे त्यांचा ओढा गावाकडे असतो. ते गावाकडे घर बांधतात. घर गावापासून दूर असते. घरात महावितरणकडून वीज मिळालेली नसते. वीज घरात येण्यासाठी हसोळकर एका अधिकाऱ्याला चक्क दोन लाखांची लाच देतात आणि अधिकारी मात्र पाच वर्षे घरातील विजेसाठी त्यांना झुलवत असतो. हसोळकर यांना सारख्या गावाला फेऱ्या माराव्या लागतात. वीज मिळावी यासाठी मंत्र्यांनीही पत्र त्यात अगदी आत्महत्येचाही उल्लेख करतात. त्यांचा नोकरीतील निवृत्तकाळही जवळ येत असतो;
मात्र त्यांचा मुलगा मयूर स्वतः घर मुंबईत असावं यासाठी झगडत असतो. वडिलांकडे दोन लाख मागत असतो. हसोळकर ते मान्य करत नाहीत. या वेळी आई-वडील आणि मुलगा यांचे कौटुंबिक द्वंद्व होते. पुढे मयूरचे ज्या मुलीशी प्रेम असते तिच्या वडिलांकडून दोन लाख रुपये कर्जाऊ घेतो. फ्लॅट बुक करतो; पण तिथेही त्याची फसवणूक होते. अखेर मुलीचे वडील घरी येतात. पैशाची मागणी करतात. मुलगी देणार नाही असे सांगतात; मात्र चारही बाजूने हतबल झालेले हसोळकर मुलाने घेतलेल्या कर्जाची रक्कम त्यांना देतात. इकडे गावाला महावितरणकडून विजेचा खांब आलेला असतो. काही दिवसांनी हसोळकर उभंयता गावाकडे जायला निघतात. निर्वासित नाटकात बीएमसी चाळीत राहणाऱ्या हसोळकर कुटुंबाचे कौटुंबिक वास्तव अभिनय, नेपथ्यातून अगदी तंतोतंत उभं करण्यासाठी युथ फोरम ही संस्था यशस्वी झाली. अतिशय सुंदर असा नाट्यप्रयोग पाहायला मिळाला.
----
* सूत्रधार आणि सहाय्य
लेखक ःस्वप्नील जाधव, दिग्दर्शक महेंद्र दिवेकर, नेपथ्य रजनीश कोंडविलकर, पार्श्वसंगीत महेंद्र मांजरेकर, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा अनिल कासकर, वेशभूषा अर्जून खामकर, वैंशपायन. रंगमंच व्यवस्था नीलेश गायकवाड, दत्ताराम जाधव, रवींद्र नवले, सेजल कांबळे.
----
* पात्र परिचय
आई ः मिनाक्षी पोकळे, मयूर ः नयन प्रभू, दर्शना ः समृद्धी कोटगी, बाबा ः महेंद्र दिवेकर, शिरोडकर ः नाना कांबळे, कांबळे ः अर्जुन खामकर, चाळकरी ः पंकज दिवेकर, सेजल कांबळे, दत्ताराम जाधव, भालचंद्र पांचाळ, मंथन जाधव, अनवी पांचाळ, किरण शेट्ये, प्रथमेश भाट, तनिषा सितप, सिद्धी मिरगळ, नीलेश गायकवाड.
----
आजचे नाटक
नाटक ः अय... सादरकर्ते ः नाट्य मल्हार प्रतिष्ठान, स्थळ ः स्वा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर. वेळ ः सकाळी ११.३० वा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com