नाट्य

नाट्य

Published on

-rat७p१८.jpg-
KOP२६O२२६५४
राज्य नाट्यस्पर्धेत नटराज नाट्य कलामंडळ, बारामती या संस्थेने सादर केलेल्या ‘कर्ण’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
------
राज्य नाट्यस्पर्धा---लोगो
नृत्य, युद्धकला अन् भावनांचा संगम : ‘कर्ण’
नटराज नाट्य कलामंडळाचे सादरीकरण; महिलांच्या दिग्दर्शनाला रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः कर्णाच्या आयुष्यातील ठळक घटना. थोडक्यात संवाद, नृत्याविष्कार, लय, देह व मिमिक यांच्या साह्याने तसेच कृष्ण व कर्णाची भेट व कुंती व कर्णाची भेट असे सुंदर प्रसंग राज्य नाट्यस्पर्धेत ‘कर्ण’ या नाटकातून पाहायला मिळाले. नटराज नाट्य कलामंडळ- बारामती या संस्थेने हा प्रयोग येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात केला. या नाटकाचे दिग्दर्शन कल्पिता राणे व विनिता जोशी यांनी एक नृत्य नाट्य ‘कर्ण’ रंगमंचावर साकार केला. मूळ लेखक कुलविंदर बक्शिश सिंह यांच्या लेखनाचा मराठी नाट्यानुवाद जयश्री देशले यांनी केला. त्या नाट्यसंहितेला कल्पिता राणे व विनिता जोशी यांनी दिग्दर्शन करून एक नृत्य नाट्य ‘कर्ण’ रंगमंचावर सादर केला. महाभारतातील असत्याची बाजू घेतल्याने कर्णाच्या आयुष्याची शोकांतिका रसिकांना भावली.
-------
पडदा उघडताच कर्णाकडे लोकं एकत्र येतात आणि रंगमंचावर ‘कर्ण’ रथाचे चाक हातात घेऊन बसलेला असतो. क्षणात ते चाक तो फेकून देतो. त्यानंतर कर्णाच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग रंगमंचावर साकार होतात. चंपानगरीमध्ये अधिरथ व राधामाता यांना कुंतीने गंगानदीत सोडलेले बाळ मिळणे, कर्णाचा लहान बंधू ‘शोण’ याच्यासोबतचे बालपण, दुर्योधनाची भेट, गुरू द्रोणाचार्यांना त्यांच्या आश्रमात घेऊन युद्धकला शिकवण्याची विनंती, द्रोणाचार्यांचा नकार, पितामह भीष्मांची भेट, सूर्यदेवांचा साक्षी ठेवून धनुर्विद्या, युद्धकला शिकण्याचा सराव, गुरुकुलातील शिष्यांच्या युद्धकला प्रदर्शनात सुतपुत्र म्हणून झालेला अपमान, पुढे दुर्योधनाकडून मैत्रीचा हात व अंगदेशचे राज्यदान बहाल, देवराज इंद्राकडून कवच कुंडलांची मागणी, परशुरामांकडून धनुर्विद्या मिळाली; मात्र त्या वेळी मिळालेला शाप, श्रीकृष्णांची एकांतात भेट व त्यांच्याकडून कर्णाच्या जन्माच्या रहस्याची उकल, कुंतीमातेची भेट आणि तिच्या पाच पुत्रांबद्दल अभय निर्णायक युद्ध व मृत्यू असे प्रसंग कर्ण या नाटकातून दाखवण्यात आले.
उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या नृत्यनाट्यात मणिपुरी मार्शल आर्ट, कलरीपयट्टू, थांग-ता, मांड-मजारा, लमजाओ, लाई हरोबा व भारतातील विविध प्रकारच्या भारतीय नृत्यप्रकारांचा लोककला व युद्ध कलांचा वापर संवाद, देहभाषा, देहबोलीद्वारे करण्यात आला असून, त्याला योग्य अशी साजेशी परिणामकारक प्रकाशयोजना वापरण्यात आली. त्यामुळे नाटकातील प्रसंगांचे सौंदर्य खूप वाढताना दिसले. तीन स्त्री कलाकारांनी रंगमंचावरच वेष बदलून (ओढणी, दुपट्टा, शाल, उपरणे) यांचा वापर करून यातील भूमिका वठवल्या. अन्याय, असत्याची बाजू घेतल्याने कर्णाच्या आयुष्याची शोकांतिका झाली, हेच या नाटकाचे कथानक अधोरेखित करते.
----
* सूत्रधार आणि सहाय्य
मुळ लेखक ः कुलविंदर बक्शिश सिंह, मराठी अनुवाद ः जयश्री देसले, दिग्दर्शक ः कल्पिता राणे, विनिता जोशी, निर्माता ः अभिषेक नारायण, प्रकाशयोजना ः चेतन ढवळे, संगीत ः भूषण भवसार, नेपथ्य ः गौरव सावंत, रंगभूषा-वेशभूषा ः प्रतिभा शेंडे-ढवळे, रंगमंच व्यवस्था ः लिखित, मुमताजअली, अपूर्वा पंडित, पूजा पटेल, नेपथ्य निर्माण ः सुजित, विक्रांत राजपूत, आंचल कुमारी.
----
* पात्र परिचय
सूत्रधार आणि कर्ण ः सायली कुबडे, शोण, अर्जून, दुर्योधन, वृक्षवर्मा ः प्रतीक्षा ठाकूर, राधामाता, मित्र, अधिरथ, द्रोण, भीष्म, वृषाली, इंद्र, परशुराम, कुंती. कृष्ण ः कल्पिता राणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com