मालवणात मोठ्या रांगा अभावानेच

मालवणात मोठ्या रांगा अभावानेच

Published on

22685

मालवणात मोठ्या रांगा अभावानेच

धीमी‍या गती; सकाळच्या टप्प्यात मतदारांमध्ये निरुत्साह

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : तालुक्यातील राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या सहा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली. सकाळच्या सत्रापासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदार मतदानासाठी जात असल्याचे दिसून आले; मात्र मतदानासाठी काही ठराविक मतदान केंद्रे सोडली तर मोठ्या रांगा कुठेही दिसून आल्या नाहीत. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत धीम्यागतीने मतदान सुरू होते. मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे पाहावयास मिळाले.
भाजप, शिवसेना, ठाकरे शिवसेना तसेच अपक्ष उमेदवारांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाऊ सामंत, पंचायत समितीचे माजी उपसभापती मधुकर चव्हाण, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह विविध पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
देवबाग येथे सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी महायुतीच्या बूथला भेट देत मतदानाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी सावंत यांच्यासोबत सरपंच उल्हास तांडेल, तालुका उपाध्यक्ष केदार झाड, प्रभारी दाजी सावजी, शक्ती केंद्रप्रमुख रामा चोपडेकर आणि बूथ अध्यक्ष गणेश मोंडकर आदी कार्यकर्ते देवबाग परिसरात सक्रिय असल्याचे दिसून आले. दुपारनंतर मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून आले.
---
22687
नवरदेवाचेही मतदान
कुंभारमाठ घुमडे या मतदान केंद्रावर श्रीकांत चव्हाण या नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. वायरी टिकम शाळा येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची रांग दिसून आली. अन्य मतदान केंद्रांवर किरकोळ मतदार मतदान करण्यासाठी जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तालुक्यात सर्जेकोट येथील सखी मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी २० टक्के मतदान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com