मतदानाच्या रणांगणात ‘सखी’ची ताकद

मतदानाच्या रणांगणात ‘सखी’ची ताकद

Published on

22705

मतदानाच्या रणांगणात ‘सखी’ची ताकद

सर्जेकोटचे सखी मतदान केंद्र; विशेष सजावटीमुळे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा येथे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सखी मतदान केंद्र करण्यात आले. या केंद्रावर केंद्राध्यक्षा, अधिकारी, कर्मचारी अशा सर्व महिला कार्यरत असल्याने महिलाही सक्षमपणे मतदान केंद्र सांभाळू शकतात, हे यातून सिद्ध झाले. मतदारांचा उत्साह वाढावा, मतदान केंद्रावर प्रसन्न आणि आनंदी वातावरण असावे, या उद्देशाने विशेष सजावट या मतदान केंद्रावर केली होती.
तालुक्यातील प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा येथे सखी मतदान केंद्र आहे. याठिकाणी भेट देत उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
यावेळी मतदान केंद्राध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक यांसह मतदान अधिकारी अनुष्का कदम, मतदान अधिकारी राधा दिघे, मतदान अधिकारी शुभांगी लोकरे, कर्मचारी सिमाली परब, सखी केंद्र झोनल अधिकारी श्वेता यादव, क्षेत्रीय झोनल अधिकारी मकरंद कुलकर्णी उपस्थित होते. तालुक्यातील एकमेव महिला केंद्राध्यक्षा म्हणून डॉ. नाईक या कार्यरत आहेत. प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा येथे सखी मतदान केंद्र या ठिकाणी ८३८ मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक ४२३ आहे, तर पुरुष मतदारांची संख्या ४१५ आहे. महिला सक्षमीकरण या हेतूने सखी मतदान हे केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रावर सर्व महिला अधिकारी असून येथे महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. आज सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती. मालवणातील सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक विभाग लक्ष ठेवून होता. सर्व ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com