मंडणगड-प्रबोधनात्मक कव्वालीने सामाजिक संदेशाचा जागर
Rat7p32.jpg
22745
भिंगळोली : प्रबोधनात्मक कव्वाली सादर करताना गायक विजय खैरे, गायिका तेजस्वी कांबळे.
--------
प्रबोधनात्मक कव्वालीने सामाजिक संदेशाचा जागर
माता रमाई जयंती ः आरपीआय आठवले गटाचे सामाजिक योगदान
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः माता रमाई आंबेडकर यांच्या १४८व्या जयंतीनिमित्त मंडणगड तालुक्यात सामाजिक प्रबोधनाचा जागर करत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या जयंती उत्सवातील सामाजिक सेवेसोबत मुख्य आकर्षण ठरलेला प्रबोधनात्मक कव्वालीचा जंगी सामना उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. सामाजिक समता, बंधूता आणि संविधानिक मुल्यांचा संदेश देणाऱ्या या कव्वाली कार्यक्रमाने परिसरात वैचारिक उत्साह निर्माण केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तालुका शाखेतर्फे दापोली तालुक्यातील वणंद येथे जाणाऱ्या हजारो आंबेडकरी अनुयायांचे दोन दिवस जंगी स्वागत करण्यात आले.
या दरम्यान अनुयायांसाठी चहा, पाणी, अल्पोपाहार तसेच आवश्यकतेनुसार आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी रिपाइं तालुका शाखेने सलग चौथ्या वर्षी समर्थनगर दापोली फाटा येथे स्वागत केंद्र उभारले. सुमारे पन्नास स्वयंसेवक या काळात अहोरात्र कार्यरत होते. कार्यक्रमात गायक विजय खैरे आणि गायिका तेजस्वी कांबळे यांच्यातील वैचारिक कव्वालीच्या जंगी सामन्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
हा कार्यक्रम दलितमित्र दादासाहेब मर्चंडे तसेच रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक आदेश मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला. तालुकाध्यक्ष नागसेन तांबे यांच्यासह संदेश खैरे, रामदास खैरे, विजय खैरे, किरण पवार, भगवान खैरे, जितेंद्र जाधव, सुरेश तांबे, शंकर पवार, विनोद कवडे, सुशांत खैरे, संकेत तांबे, विधान पवार, संकेश कासारे व गौरव मर्चंडे आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

