छत्रपती शिवरायांचा आदर्श अंगीकारल्यास यश निश्चित
22901
छत्रपती शिवरायांचा आदर्श
अंगीकारल्यास यश निश्चित
कुबल ः मडुरा येथे बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळते,’ असे प्रतिपादन दयानंद कुबल यांनी मडुरा येथे केले. व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष मंगेश कामत, प्रकाश वालावलकर, रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे, प्रवीण परब, मंगल कामत, माजी मुख्याध्यापक भिकाजी धुरी, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, मुख्याध्यापिका नीती साळगावकर आदी उपस्थित होते. श्री. कुबल म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक व शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांबरोबर सातत्याने संवाद ठेवून त्यांना प्रोत्साहन द्यावे, तर शिक्षकांनी कठोर मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवावे. शिस्त, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावरच विद्यार्थी उज्ज्वल यश प्राप्त करू शकतात.’ यावेळी विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. नीती साळगावकर यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

