हेगशेट्ये कॉलेजतर्फे डिनरसाठी विलुप्त कोकण थीम
हेगशेट्ये कॉलेजतर्फे
डिनरसाठी विलुप्त कोकण थीम
रत्नागिरी, ता. ८ ः कोकणच्या मातीतील अनेक चविष्ट आणि पारंपरिक पाककृती काळाच्या ओघात विस्मृतीत जात आहेत. याच ऐतिहासिक व दुर्मीळ चवींना पुन्हा एकदा प्रकाशात आणण्यासाठी रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी तर्फे ‘विलुप्त कोकण’ या भव्य थीम डिनरचे आयोजन केले आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांच्या ‘लाईव्ह प्रॅक्टिकल’चा भाग असलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन उद्या (ता. ८) सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
पाचशे वर्षांपूर्वीच्या अस्तंगत होणाऱ्या कोकणी रेसिपींना नवा साज देऊन सादर करणारा हा उपक्रम कोकणच्या पर्यटन आणि हॉटेलिंग उद्योगाला संशोधनात्मक नवा आयाम देणारा ठरणार आहे. या शाही खानपान थीममध्ये छत्रपती शिवरायांच्या काळापासून जोडलेले अनेक अपरिचित पदार्थ चाखायला मिळणार आहेत. यात शाकाहारी पदार्थांमध्ये तिवाल पेय, गरम हुलग्याचे मांडगे, पंगोजी, काकडीचा कोरडो, खारे बडेर, शहाळे काजू तोंडाक, बटाटा हूमण, डक्कू डाळ आणि आंबोळी यांचा समावेश आहे. तसेच मांसाहारी व मत्स्याहारी खवय्यांसाठी कोलिम भजी, कारवारी चिकन, मटन धान शिकोरी, बांगडा उपकरी, वाल कोळंबी भात, किसमूर, मिरचीचे झीट मिटले आणि खांतोळी अशा अनेक पदार्थांची रेलचेल असणार आहे. खवय्यांसाठी ही एक विशेष संधी असून, या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन रत्नागिरीकरांनी अस्सल आणि दुर्मीळ कोकणी चवींचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

