आज निकाल; वाढली धाकधूक
22917
आज निकाल; वाढली धाकधूक
सावंतवाडीत आज मतमोजणी; दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी ६९.५४ टक्के मतदान झाले. या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असून, उद्या (ता. ९) सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
ही मतमोजणी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणनिहाय करण्यात येणार आहे. तालुक्यात एकूण १८ गण असून १८ फेऱ्यांमध्ये ही मोजणी पूर्ण होईल. प्रत्येक फेरीत संबंधित गणात जेवढी मतदान केंद्रे आहेत, तेवढी टेबल लावली जाणार आहेत. म्हणजेच एका वेळी एका गणाची मोजणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जातील. उदाहरणार्थ, पहिल्या फेरीत ३९-माडखोल जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या माडखोल गणाची ६ केंद्रांची मोजणी होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीत कलंबिस्त गणाची ८ केंद्रांची मोजणी होईल. अशा प्रकारे दोन फेऱ्यांत एका जिल्हा परिषद गटाचा निकाल पूर्ण होणार आहे.
----------
कडेकोट पोलिस बंदोबस्त
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

