नाणीजमध्ये १ लाख ७१ हजार बाटल्या रक्त संकलन

नाणीजमध्ये १ लाख ७१ हजार बाटल्या रक्त संकलन

Published on

- rat९p४.jpg-
P२६O२३०९३
नाणीजक्षेत्री रक्तदानाच्या विक्रमी संकलनाबद्दल रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचा महाराष्ट्र शासनातर्फे रविवारी गौरव करताना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, शेजारी पालकमंत्री उदय सामंत, कानिफनाथ महाराज आदी.
-----
नाणीजमध्ये १ लाख ७१ हजार बाटल्या रक्त संकलन
पंधरा दिवसांत कार्यवाही; पालकमंत्र्यांच्या हस्ते नरेंद्राचार्यजींचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ९ ः जगद्‍गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने अवघ्या १५ दिवसांत १ लाख ७१ हजार १५० बाटल्या रक्त संकलित झाले आहे. या माध्यमातून सुमारे १७ लाख रुग्णांना जीवनदान मिळणार असून, ही एक मोठी आध्यात्मिक क्रांती आहे, असे गौरवोद्‍गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे काढले.
नाणीज येथे आयोजित भव्य रक्तदान मोहिमेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, कानिफनाथ महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मोहिमेत योगदान दिलेल्या रक्तदात्यांचा व कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.
मंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या रक्तसंकलनाची मोठी जबाबदारी नरेंद्राचार्यजी महाराजांनी पेलली आहे. एका व्यक्तीच्या प्रेरणेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होणे, हा एक जागतिक विक्रमच आहे. शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेपूर्वी महाराजांची रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाते. या प्रभावी सिस्टीमचा अभ्यास आता शासनालाही करावा लागेल. मंत्रालय जे काम करते तेच कार्य हे पीठ अत्यंत प्रभावीपणे सामाजिक भावनेतून करत आहे. आरोग्य विभागात महाराजांचे मोठे योगदान असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराजांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले, रक्तदान, देहदान आणि अवयवदानाच्या माध्यमातून नरेंद्राचार्यजी महाराज आरोग्य विभागाचा भार हलका करत आहेत. या सामाजिक चळवळीमागे मोठे आध्यात्मिक अधिष्ठान असून, हा रक्तदान यज्ञ खरोखरच कौतुकास्पद आहे.
जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी महाराजांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा केला तर कानिफनाथ महाराज यांनी ‘हा गरिबांच्या उद्धाराचा यज्ञ आता थांबणार नाही,’ असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला अभिनेते आनंद कारेकर, रक्त संकलन परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप, सरपंच विनायक शिवगण यांसह हजारो भाविक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com