फोटो फिचर

फोटो फिचर

Published on

फोटो फिचर

मतमोजणीवेळचा जल्लोष....!

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी नऊ तालुक्यात आज शांततेत झाली. निकालाची उत्सुकता लागलेले कार्यकर्ते आज सकाळपासूनच मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून होते. ज्यांना विजयाची खात्री होती त्यांच्या समर्थकांनी गुलाल, ढोलताशे यांची तयारी करून ठेवली होती. निकाल जाहीर होत गेला तसा समर्थकांचा जल्लोष सुरू झाला. कुणी नेत्यांना तर कुणी विजयी उमेदवाराला उचलून घेत तर कुणी पक्षाचा झेंडा उंचावून आपला आनंद साजरा करताना दिसत होते. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले तर पराभूत झालेल्या उमेदवारांच्या पेंडॉलमध्ये शांतता होती. मतमोजणी केंद्रावरील वातावरणाची तालुकानिहाय झलक छायाचित्रातून मांडलेली आहे....!

ओळी
- rat9p6.jpg-
26O23114
रत्नागिरी ः शहराजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे सुरू असलेल्या मतमोजणीवेळी महायुतीसह मित्रपक्षांच्या पेंडॉलमध्ये झालेली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी.
- rat9p8.jpg-
P26O23155
रत्नागिरी ः महाविकास आघाडीच्या मंडपात शुकशुकाट.
- rat9p9.jpg-
P26O23156
रत्नागिरी ः कडकडीत उन्हामुळे त्रस्त कार्यकर्ते झाडाच्या सावलीत बसलेले आहेत.
- rat9p10.jpg-
26O23149
चिपळूण ः तालुक्यातील शिवसेनेचे विजयी उमेदवार जल्लोष करताना.
- rat9p14.jpg-
P26O23153
लांजा ः निवडणुकीतील विजय साजरा करताना शिवसेनेचे कार्यकर्ते.
- rat9p15.jpg-
P26O23154
खेड ः भडगाव गटात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजय बिरवटकर यांनी विजय मिळवल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर आल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत अभिनंदन केले.
- rat9p12.jpg, rat9p13.jpg-
26O23151, 26O23152
मंडणगड: मंडणगड तालुक्यातील सहाही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आनंदाचा जल्लोष करताना शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते.
- rat9p17.jpg ः
26O23168
दापोली :- केळशी जिल्हा परिषद गटातून विजयी उमेदवार यांचा हार घालून त्यांचे अभिनंदन करताना शिवसेनेचे पदाधिकारी.
- rat9p18.jpg-
26O23169
खेड शहरातील गोळीबार मैदान येथे मतमोजणी केंद्राबाहेर विविध पक्षाच्या कार्यकत्यांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली होती.
- rat9p20.jpg-
OP26O23171
दापोली :- केळशी पंचायत समिती गणातून निवडून आल्यानंतर विजयोत्सव साजरा करताना विजयी उमेदवार संदीप चिखले.
- rat9p21.jpg-
26O23172
राजापूर ः विजयी उमेदवाराला खांद्यावर उचलून घेऊन विजयाचा जल्लोष करताना कार्यकर्ते.
- rat9p22.jpg-
26O23175
दापोली ः विजयानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.
- rat9p23.jpg-
OP26O23176
देवरूख ः विजयाचा गुलाल उधळताना कार्यकर्ते.

----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com