संगमेश्वरात ठाकरे सेनेकडून दिग्गजांचा पराभव

संगमेश्वरात ठाकरे सेनेकडून दिग्गजांचा पराभव

Published on

-rat९p२७.jpg-
२६O२३२०८
संतोष थेराडे, नेहा माने, विशाखा कुवळेकर
------
संगमेश्वरात ठाकरे सेनेकडून दिग्गजांचा पराभव
थेराडे, माने, कुवळेकर विजयी; विनोद म्हस्के, रचना महाडिकांचा पराभव
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ९ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन शिलेदार जिल्हा परिषद गटात विजयी झाले असून, त्यांनी दिग्गज मंडळींचा पराभव केला आहे. संगमेश्वर तालुक्यात अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा करिष्मा कायम असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कडवई गटातून संतोष थेराडे, कसबा गटातून विशाखा कुवळेकर तर साडवली जिल्हा परिषद गटातून नेहा माने यांनी विजय मिळवला.
कडवई जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद म्हस्के यांनी मोठी ताकद पणाला लावली होती; मात्र या जिल्हा परिषद गटात पूर्वीपासून प्रतिनिधित्व करणारे संतोष थेराडे यांनी केलेली विकासकामे, त्यांचा या गटात असणारा सातत्यपूर्ण संपर्क, तळागाळातील लोकांसाठी केलेले काम आणि निवडणुकीदरम्यान जिवाची बाजी लावून केलेला प्रचार यामुळे थेराडे यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार विनोद म्हस्के यांचा दुसऱ्या वेळी पराभव केला आहे.
सर्वाधिक महत्त्वाची लढत ठरली ती कसबा जिल्हा परिषद गटात. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असणाऱ्या रचना महाडिक यांना पुन्हा एकदा कसबा जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मिळाली होती. त्यांच्यासमोर नवख्या असणाऱ्या विशाखा कुवळेकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने उमेदवारी दिली होती. कुवळेकर या जरी नवख्या असल्या तरी त्यांना हलक्यात घेणे शिंदेगटाच्या रचना महाडिक यांना भारी पडल्याचे आज जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले. विशाखा कुवळेकर यांनी कसबा जिल्हा परिषद गट अक्षरशः पिंजून काढला. ज्या वेळी रचना महाडिक यांनी पक्ष बदलला आणि त्या शिंदे शिवसेनेत सामील झाल्या तरीही या गटातील मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडेच कायम राहिल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. कसबा गटातील आजचा निकाल हा शिंदे शिवसेनेला हादरा देणारा ठरला आहे.
साडवली जिल्हा परिषद गटात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नेहा रवींद्र माने यांनाच पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेतून शिंदेगटात प्रवेश केला असला तरी नेहा आणि रवींद्र माने हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ राहिले. येथे त्यांच्या विरोधात महायुतीच्या रूपाली कदम रिंगणात होत्या. त्यांचा माने यांनी पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com