ग्रंथालय संघाचे २१ पासून रत्नागिरीमध्ये अधिवेशन
पुस्तकाचे क्लिपआर्ट वापरा
०००
ग्रंथालय संघाचे २१ पासून
रत्नागिरीमध्ये अधिवेशन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सवी, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे २७वे आणि रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे ४९वे संयुक्त राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी नाचणे येथील बालाजी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार भूषवणार असून, उद्घाटन राज्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
रत्नागिरी होणाऱ्या या अधिवेशाला प्रमुख अतिथी म्हणून गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार असून, उद्योजक दीपक गद्रे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच ज्येष्ठ साहित्यिक कृष्णाजी कुलकर्णी हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
या महत्त्वपूर्ण अधिवेशनात ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथसखा वाचनालय विश्वस्त श्याम जोशी, सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील यांच्यासह राज्य व कोकण विभागातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘सार्वजनिक ग्रंथालयांची आत्मनिर्भरता, संगणकीकरण आणि उत्पन्नाची साधने वाढवणे’ या विषयांवर सखोल चर्चा व विचारमंथन होईल. याच दिवशी राज्य, विभाग व जिल्हा ग्रंथालय संघांच्या नियामक मंडळाच्या सभाही पार पडतील. दुसऱ्या दिवशी रत्नागिरीतील शताब्दी पूर्ण केलेल्या ग्रंथालयांवर परिसंवाद आणि ग्रंथालय सेवकांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या शेवटी होणाऱ्या खुल्या अधिवेशनातून ग्रंथालय चळवळीच्या भविष्यासाठी नव्या संकल्पना आणि दिशा मांडल्या जाणार आहेत.
जिल्हा ग्रंथालय संघ व आमदार स्व. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्यावतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, कार्याध्यक्ष रामदास गायकवाड, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, कार्यवाह महेंद्र दळवी यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. ग्रंथालय चळवळीला नवी ऊर्जा देणाऱ्या या अधिवेशनास जिल्ह्यातील ग्रंथालय सेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

