जल्लोष विजयाचा...

जल्लोष विजयाचा...
Published on

लीड

जल्लोष विजयाचा...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होताच गावगाड्याचे कारभारी अखेर ठरले. यामुळे जिल्हातील ग्रामीण भाग गुलालात न्हाऊन निघाला. विजयी उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदाचा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि जल्लोषात विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात एका विजयी उमेदवाराने कार्यकर्त्यांसमोर चक्क दंडवत घालून कृतज्ञता व्यक्त केली. या अनोख्या आणि भावनिक क्षणाने उपस्थित कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले, तर हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाल्याने तो सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. गावगाड्यातील काही निवडक क्षणचित्रे...

23288
देवगड ः येथे ठाकरे शिवसेना उमेदवाराच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला.
23289
देवगड ः येथे विजयानंतर सदाशिव ओगले यांनी कार्यकर्त्यांना दंडवत घातला.
23290
देवगड ः येथे संजय बोंबडी यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
---------
सावंतवाडी

23326
कोलगाव ः जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष निवडून आल्यानंतर मायकल डिसोजा यांनी वडील (कै.) फ्रान्सिस डिसोजा यांच्या फोटोसह विजयी जल्लोष केला.
23327
न्हावेली ः पंचायत समितीमधून शिंदे शिवसेनेचे शरद भास्कर विजयी होताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला.
23328
माजगाव ः पंचायत समितीमधून बहुमताने निवडून आलेल्या विक्रांत सावंत यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला.
23329
तळवडे ः मतदारसंघातून विजयी होताच संदीप गावडे यांना समर्थकांनी उचलून घेत आनंद व्यक्त केला.
23330
आरोंदा ः जिल्हा परिषदेमधून निवडून आलेल्या सुदन कवठणकर यांना तर सातार्डा पंचायत समितीमधून निवडून आलेल्या उदय पारिपत्ये यांना समर्थकांनी उचलून घेत जल्लोष केला.
23331
मळेवाड ः जिल्हा परिषदेमधून निवडून आलेल्या धनश्री मराठे व अपर्णा सातोसकर यांच्यासमवेत कार्यकर्ते.
23337
माजगाव ः निवडून आल्यानंतर विजयी खुण दाखवताना विक्रांत सावंत, पंचायत समितीच्या उमेदवार उत्कर्ष गावकर, अशोक दळवी व इतर.
-----------
कुडाळ तालुका
23269
नेरुर ः जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष विजयी उमेदवार रुपेश पावसकर व ठाकरे शिवसेनेच्या अर्चना बंगे, दीप्ती नाईक, अतुल बंगे.
23270
कुडाळ ः विजयी उमेदवार दादा साईल, दीपलक्ष्मी पडते, बाळकृष्ण मडव, नितीन म्हाडेश्वर.
23271
कुडाळ ः मतमोजणीच्या केंद्राला आमदार नीलेश राणे यांनी भेट दिली.
-----------
कणकवली तालुका
23265
कणकवली : फोंडाघाट मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजन चिके विजयी झाल्‍यानंतर कार्यकर्त्यांनी जल्‍लोष केला.
-------------
23266
कणकवली : हरकुळ बुद्रूक मतदार संघातून विजयी झालेल्‍या मनोज रावराणे, चंद्रहास सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी विजयोत्‍सव साजरा केला.
-------------
23267
कणकवली : कलमठ मतदारसंघातील विजयानंतर जल्‍लोष करताना भाजप कार्यकर्ते.
---------------
23268
कणकवली : नाटळ जिल्‍हा परिषद मतदारसंघातून संदेश उर्फ गोट्या सावंत विजयी झाल्‍यानंतर त्‍यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी जल्‍लोष केला.
---------------
(छायाचित्रे ः वैभव केळकर, रुपेश हिराप, अजय सावंत, अनिकेत उचले)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com