संगमेश्वर-माजी सभापती जयसिंग मानेंचा पराभव

संगमेश्वर-माजी सभापती जयसिंग मानेंचा पराभव
Published on

rat9p29.jpg-
23318
देवरूख ः कोंडगाव गणात माजी सभापती जयसिंग माने यांचा पराभव केल्यानंतर जल्लोष करताना ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते.
----------
माजी सभापती जयसिंग मानेंचा पराभव
कोंडगाव गणात धक्कादायक निकाल; सागर तांदळे विजयी
संगमेश्वर, ता. १० ः संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव पंचायत समिती गणातून उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सागर तांदळे १५२० मतांनी विजय झाले असून, माजी सभापती जयसिंग माने यांचा दारूण पराभव केला. माने यांनी शिंदेगटात प्रवेश केला होता; मात्र साखरपा-कोंडगाव येथील जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी प्रामाणिक राहून स्वार्थासाठी पक्ष बदललेल्या मंडळींना या निवडणुकीत धडा शिकवला आहे.
तांदळे हे सामान्य कुटुंबातील असून, माजी सभापती माने अशा मुरलेल्या मुरब्बी राजकारण्याला भूईसपाट करणे ही त्याच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कठीण गोष्ट असतानाही जनतेचा कौल आणि (कै.) पिंट्या तांदळे आणि माजी मंत्री रवींद्र माने यांच्या आशीर्वादाने प्रचंड मतांनी निवडून आले. तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात या निवडणुकीची चर्चा होती. जनतेच्या मनात काय असू शकतं हे या विजयावरून समोर आले आहे, असे माजी मंत्री रवींद्र माने यांनी सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com