आंगणेवाडीत रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन
swt104.jpg
23599
सिंधुदुर्गनगरी ः उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षाबाबत जागृती करण्यात आली.
आंगणेवाडीत रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन
जत्रोत्सवातील उपक्रम ः चित्ररथ, एलईडी स्क्रीनद्वारे जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः श्री भराडी देवी जत्रोत्सवात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने उपस्थित लाखो भाविकांसमोर रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करत सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. जत्रोत्सवासाठी आलेल्या लाखो भाविकांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष चित्ररथ व एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली होती. या माध्यमातून रस्ता सुरक्षा नियम, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा पाळणे, मद्यपान करून वाहन न चालवणे आदी विषयांवर माहिती देण्यात आली. तसेच भाविकांना रस्ता सुरक्षा विषयक माहितीपत्रिकांचे वाटप करून सुरक्षित वाहनचालना संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी उपस्थित भाविकांना संबोधित करत सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे, मोटार वाहन निरीक्षक रत्नकांत ढोबळे, संकेत सोमणाचे, अमित पाटील, अमित नायकवाडी आदींसह चालक लहू वाळके, सचिन सावंत, रामदास पाखरे यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले. या उपक्रमामुळे भाविकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक जनजागृती करतानाच सुरक्षित प्रवासाचा संदेश प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

