महेश इंगळे यांचा कुडाळ येथे सत्कार

महेश इंगळे यांचा कुडाळ येथे सत्कार

Published on

swt103.jpg
23598
कुडाळ ः महेश इंगळे यांचा सत्कार करताना राकेश कांदे व इतर मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)

महेश इंगळे यांचा
कुडाळ येथे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः अक्कलकोट येथील स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या नाबरवाडी येथील ‘स्वामी सदन’ या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी कांदे कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. त्यांचा स्वामी समर्थांची प्रतिमा, शाल आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी अक्कलकोट येथील मंदिराचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले, देवगड हडपीठ मठाचे नंदकुमार पेडणेकर आदींसह भाविकांची उपस्थित होती. इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव कथन केले. स्वामींच्या नामस्मरणात आणि जयघोषात हा सोहळा पार पडला. यावेळी स्वामीभक्त सदानंद कांदे, सागर कांदे, अनिश सावंत, राजेश मांजरेकर, नितीन सोलकर, सचिन कुडतरकर, बापू सावंत, मयूर कुडतरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com