डॉ. पी. पी. कुलकर्णी यांची नियुक्ती

डॉ. पी. पी. कुलकर्णी यांची नियुक्ती

Published on

rat१०p७.jpg-
२६O२३५८६
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसर संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचे अभिनंदन करताना डॉ. पांडुरंग पाटील, अभिनंदन बोरगावे आदी.
----
मुंबई विद्यापीठ उपपरिसर
संचालकपदी डॉ. कुलकर्णी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील पद्मभूषण धनंजय कीर उपपरिसराच्या संचालकपदी डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित स्वागत समारंभात त्यांनी उपपरिसराच्या भविष्यातील वाटचालीबाबत विविध महत्त्वपूर्ण धोरणांची रूपरेषा मांडली.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार कायदा, व्यवस्थापन, पत्रकारिता आदी व्यावसायिक अभ्यासक्रम मागणीनुसार सुरू करणे, महाविद्यालय व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विद्यापीठीय सेवा या कार्यालयाच्या स्तरावर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करून विकेंद्रीकरणाचा विस्तार करणार असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. संशोधन व औद्योगिक क्षेत्राशी दुवा मजबूत करणे, भारतीय ज्ञानपद्धती, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम आदी बाबींना चालना देणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अधिक सक्षम व विद्यार्थीभिमुख करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
डॉ. कुलकर्णी यांना रसायनशास्त्र विषयातील तब्बल ३६ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून, ते गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे कार्यरत होते. साडेतीन वर्षे प्राचार्य, प्रशासकीय उपप्राचार्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ते मुंबई विद्यापीठाचे पीएचडी मार्गदर्शक असून, अनेक एमफिल व पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com