बांदा खेमराज हायस्कूल केंद्रावर २५९ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था

बांदा खेमराज हायस्कूल केंद्रावर २५९ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था

Published on

swt108.jpg
23611
बांदा ः खेमराज हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्राचार्य प्रदीप देसाई व इतर.

बांदा खेमराज हायस्कूल केंद्रावर
२५९ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १०ः उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एचएससी) अर्थात बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. सावंतवाडी तालुक्यातील बांदा परीक्षा केंद्रावर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील २२१ तसेच व्यावसायिक विभागातील ३८ असे एकूण २५९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथील जुन्या इमारतीसह नव्या इमारतीतील तळमजला व पहिला मजला येथे केली आहे.
यंदा परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गावर परीक्षकांसह सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यात येणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रा. प्रदीप देसाई यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देत शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ शिक्षक नानासाहेब साळुंखे यांनी परीक्षेस सामोरे जाताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा केंद्राधिकारी आपा राऊळ यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, पर्यवेक्षक प्रमोद सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com