भाजपसाठी निष्ठेने, अविरत कार्यरत राहीन ः बिर्जे
23615
सचिन बिर्जे
भाजपसाठी निष्ठेने, अविरत
कार्यरत राहीन ः बिर्जे
पराभवाने खचून जाणार नाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो. माजगाव पंचायत समिती निवडणुकीचा निकाल मी नम्रपणे स्वीकारतो. या पराभवाने खचून न जाता, अधिक जोमाने जनतेच्या प्रश्नांसाठी आणि पक्षकार्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन, असा विश्वास बांदा मंडळ उपाध्यक्ष आणि भाजपचे पराभूत उमेदवार रुपेश उर्फ सचिन बिर्जे यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या निकालानंतर आपली भूमिका मांडतांना त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, की या निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी आणि मतदारांनी जे प्रेम दाखवले आणि जे अथक परिश्रम घेतले, ते कोणत्याही विजयापेक्षा अमूल्य आहेत. निवडणुकीतील जय-पराजय हा लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे; मात्र जनतेची सेवा करणे हे माझे अंतिम ध्येय आहे. पराभव हा शेवट नसून ती एका नव्या सुरुवातीची पायरी आहे, असे मानून मी भविष्यात अधिक जोमाने कार्यरत राहणार आहे. भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम अविरतपणे आणि निष्ठेने सुरू ठेवीन. पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सार्थकी लावण्याचा माझा मानस आहे. तळागाळातील लोकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी माझे योगदान यापुढेही सातत्याने सुरूच राहील. ज्या मतदारांनी आणि हितचिंतकांनी या प्रवासात मला साथ दिली, त्या प्रत्येकाचा मी मनापासून ऋणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

