''अक्षरोत्सव'' संदेशपत्र प्रदर्शनास साहित्य संमेलनामध्ये प्रतिसाद
swt1010.jpg
23625
रिंगणे ः ‘अक्षरोत्सव’ प्रदर्शनची पाहणी करताना पंडित विदुर महाजन, डॉ. अपर्णा महाजन, बाळकृष्ण चव्हाण. सोबत निकेत पावसकर.
‘अक्षरोत्सव’ संदेशपत्र प्रदर्शनास
साहित्य संमेलनामध्ये प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १० : पद्मश्री कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली लांजा तालुक्यातील (ता. रत्नागिरी) रिंगणे येथे झालेल्या ११ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात येथील निकेत पावसकर यांच्या ‘अक्षरोत्सव’ या अनोख्या संदेश पत्रांचे प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांनी या संग्रहाचे कौतुक केले.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई आणि रिंगणे, व्हेळ, आरगाव, कोंडगे, कुरंग, झर्ये ग्रामस्थ आयोजित मराठी साहित्य संमेलन रिंगणे येथील श्री सरस्वती माध्यमिक विद्यामंदिरमध्ये नुकतेच पार पडले. यावेळी ''अक्षरोत्सव''चे उद्घाटन बाळकृष्ण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय या प्रदर्शनादरम्यान विद्यार्थी आणि परिसरातील ग्रामस्थांनी या प्रदर्शनाला भेट दिली. अनेक मान्यवरांनी पावसकर यांच्या या संकल्पनेचे कौतुक केले. पद्मश्री भिकल्या धिंडा, सतार वादक पं. विदुर महाजन, लेखिका डॉ. अपर्णा महाजन, नाट्य समीक्षक विजय लाड, आंतरराष्ट्रीय व्यंग चित्रकार प्रभाकर वाईरकर, कवी अजय कांडर, दिग्दर्शक हर्षद पांचाळ आदींनी, ‘अक्षरोत्सव’ भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत सदिच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

