आई देवी भराडी, तुझी छत्रछाया आम्हावर सदैव राहो!
(सूचना - फोटो टॉपला मोठे वापरा, मजकुरात एखादा घ्या..विषय हाप पेजपर्यंत आला तर येऊदे)
---------
23688
23690
आंगणेवाडी ः यात्रोत्सवात सोमवारी रात्री झालेली गर्दी.
23666
आंगणेवाडी ः यात्रेत सोमवारी रात्री ताटे लावण्याचा कार्यक्रम पार पडला.
23667
आंगणेवाडी ः मिठाईच्या दुकानात भाविकांची गर्दी झाली होती.
23668
आंगणेवाडी ः कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी भराडी मातेचे दर्शन घेतले.
23669
आंगणेवाडी ः यात्रोत्सवामध्ये भाविकांची झालेली गर्दी.
आई देवी भराडी, तुझी छत्रछाया आम्हावर सदैव राहो!
देवीचरणी भाविकांचे साकडे; १० लाखांहून अधिक भाविक मातेच्या चरणी नतमस्तक
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : ‘कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाला. आई भराडी देवीच्या जयघोषाने संपूर्ण आंगणेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. दोन दिवसांच्या या सोहळ्यात सुमारे १० लाखांहून अधिक भाविकांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आपले नवस फेडले.
यात्रेचा सर्वात महत्त्वाचा आणि धार्मिक विधी असलेला ‘ताटे लावण्याचा’ कार्यक्रम सोमवारी (ता. ९) रात्री ९ ते १ यावेळेत मोठ्या थाटात पार पडला. देवीच्या मानकऱ्यांच्या सौभाग्यवतींनी प्रसादाची ताटे डोक्यावर घेऊन मंदिरात आणली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आणलेल्या नैवेद्याच्या ताटांनी मंदिर परिसर भरून गेला होता. या विधीनंतर भाविकांनी आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यंदा मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि लांबवर जाणारे लेझर प्रकाशझोत भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. मंदिर परिसरातील भव्य सभामंडप आणि रोषणाईसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी दिसून आली. भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थांनी नऊ रांगांचे चोख नियोजन केले होते. यामुळे लाखो भाविक असूनही दर्शन प्रक्रिया सुलभरित्या पार पडली. यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पोलिस प्रशासन, महसूल, आरोग्य, महावितरण विभाग, एसटी प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय मुंबई व स्थानिक मंडळ यांनी मेहनत घेतली. यात्रेच्या निमित्ताने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. खाजा-मिठाईची दुकाने, खेळणी, शेतीची अवजारे, कपडे आणि हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत होता. आकाशपाळणा आणि ''मौत का कुआ'' यांसारख्या खेळांनी पर्यटकांचे मनोरंजन केले.
----
वार्षिक यात्रोत्सव शांततेत!
आंगणेवाडीच्या प्रथेनुसार, पहिल्या दिवशी पाहुण्यांना आणि भाविकांना प्राधान्य दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी मुंबई, पुण्याहून आलेले आंगणे कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांनी रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले. कोणतीही अनुचित घटना न घडता यात्रोत्सव शांततेत पार पडल्याने ग्रामस्थांनी सर्व भाविकांचे आभार मानले. ‘माय माऊली, तुझी कृपा सदा आम्हावरी राहुदे’ अशा शब्दांत भाविकांनी देवीकडे साकडे घालून या वर्षाच्या यात्रेचा निरोप घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

