जीवनाचा, जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो
फोटो ओळी
-rat१०p२६.jpg-
२६O२३६५२
चिपळूण ः धामणवणे येथील बांधावरचे संमेलनात पारंपरिक वाद्य ‘संबळ’च्या गजरात शिवारातून फेरी मारण्यात आली.
-rat१०p२८.jpg-
P२६O२३६५४
शिवारफेरीत सहभागी झालेले मान्यवर.
-rat१०p२९.jpg-
P२६O२३६५५
बांधावरचे संमेलनाचे उद्घाटन शेणाने सारवलेल्या बांधासमोर श्रीफळ वाढवून करण्यात आले.
-rat१०p३०.jpg-
२६O२३६५६
संमेलनात खुर्च्यांना फाटा देऊन पारंपरिक भारतीय बैठकीवर बसलेले रसिक.
-rat१०p३१.jpg-
P२६O२३६५७
बांधावरच भारतीय बैठकीवरच मान्यवरही विराजमान झाले होते.
-rat१०p३२.jpg-
२६O२३६५८
काव्य संमेलनाला उपस्थित महिला.
------
बांधावरचे संमेलन--लोगो
‘साहित्य समस्यांचे निराकरण करते’
सुहास बारटक्के ः संबळचा निनाद, मातीच्या घाटाचे, वारुळाचे पूजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः आपण सर्व निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे कवी, लेखकांना निसर्गापासून वेगळे, दूर करता येत नाही. त्यांना कृत्रिम जीवन नसते. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचे सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्व जास्त महत्त्वाचे असून, जीवनाचा आणि जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो. साहित्य समस्यांचे निराकरण करते. साहित्य रिझवतं, शिकवतं, माहिती देते, कैफियत मांडतं, मानवी जीवनातील कंगोरे दाखवते म्हणूनच ते आपल्याला जवळचं वाटतं, असे प्रतिपादन बांधावरचे संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुहास बारटक्के यांनी केले.
माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास, असे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेणारे बांधावरचे संमेलन रविवारी (ता. ८) चिपळूणनजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयूराची’ शिवारात झाले. संमेलनाचे उद्घाटन शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, पारंपरिक वाद्य संबळच्या निनादात श्रीसातेरी मातेच्या वारुळाचे पूजन आणि पवित्र वाशिष्ठी-नर्मदा गंगाजलाने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन करून झाले. या वेळी पारंपरिक आरज लावून आणि भलरी गाऊन या सोहळ्याला प्रारंभ झाला. या वेळी संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के, स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी, उद्घाटक डॉ. प्रशांत पटवर्धन, आमदार शेखर निकम, कोकणात सलग ११ ग्रामीण साहित्य संमेलने यशस्वी करणारे सुभाष लाड, वाशिष्ठी उद्योगसमुहाच्या प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव, नामवंत कवी अरुण म्हात्रे आदी उपस्थित होते.
प्रा. सोनाली खर्चे यांनी लिहिलेल्या आणि अमेय वराडे यांनी संगीतबद्ध केलेल्या बांधावरच्या गीताचे सादरीकरण वीणा परांजपे, सुखदा परांजपे, संगीता जोशी, संध्या आठल्ये, अपर्णा नातू, छाया पोटे, स्नेहल दीक्षित, संजय शिंदे, विजय कदम यांनी केले. साथसंगत यदुवीर चौगुले यांनी दिली. धीरज वाटेकर यांनी आभार मानले.
डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यक्रमाचे सिंहावलोकन केले. आजच्या तरुणाईची भाषा बदलती आहे. ती संमिश्र असून, इंग्रजीच्या जवळ जाणारी आहे; मात्र ती जीवंत असून, तिचे स्वागत करायला हवे, असे सांगितले.
दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ काव्य अभ्यासक विजय जोशी यांचे कविता : तंत्र आणि मंत्र या काव्यविवेचनाला रसिकांनी छान प्रतिसाद दिला. दुपारी ज्येष्ठ कथाकार सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन या सत्रात अमोल पालये (तिलोरी), ज्ञानेश्वर झगडे (खारवी) यांनी बोलभाषांतील कथांचे उत्तम सादरीकरण केले. नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कवींचे ‘माती, नाती अन् माणूस’ या विषयावर काव्यसंमेलन रंगले.
चौकट
जागोजागी अशी संमेलने व्हावीत
आजकाल साहित्य संमेलनामध्ये मंडपाचाच खर्च लाखो-कोटींच्या घरात जातो. अशा स्थितीत मंडपाशिवाय नैसर्गिक स्थितीत काजूच्या गर्द वनराईत बांधावर आयोजित केलेले मराठी साहित्यक्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग असलेले हे संमेलन अनोखे, अनुकरणीय ठरले. जागोजागी अशी संमेलने व्हायला हवीत. या संमेलनातून धोक्यात आलेल्या वनस्पती सृष्टी, प्राणिसृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल, हे समाजाला सांगायला हवे. साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा, अशी भूमिका मान्यवर साहित्यिकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

