गावडेंच्या विजयोत्सवात ‘दैवत’ फलक लक्षवेधी

गावडेंच्या विजयोत्सवात
‘दैवत’ फलक लक्षवेधी
Published on

23686

गावडेंच्या विजयोत्सवात
‘दैवत’ फलक लक्षवेधी

रवींद्र चव्हाण यांना यशाचे श्रेय

सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. १० ः तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. या विजयानंतर त्यांनी आपल्या कृतज्ञतेची भावना एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्यक्त केली आहे. विजयाची घोषणा होताच गावडेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या फोटोवर ‘दैवत’ असा संदेश लिहिलेला फलक फडकवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी चव्हाण यांना देत हा विजय त्यांनाच अर्पण केला.
​विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर तळवडे मतदारसंघात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य विजय रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. या रॅलीदरम्यान गावडे यांनी आपल्या हातातील ‘दैवत’ फलक उंचावून विजयोत्सव साजरा केला. मी आज जे काही यश मिळवले आहे, त्यामागे खऱ्या अर्थाने चव्हाण यांची ताकद आणि मार्गदर्शन आहे. त्यांच्यामुळेच हा विजय शक्य झाला. तसेच पालकमंत्री नीतेश राणे, खासदार नारायण राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे व महायुतीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मी आभारी आहे. हा विजय मी त्यांच्यासह सर्व मतदारांना कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहे, अशा भावना गावडें यांनी व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या रॅलीने संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com