ओटवणेत कॅंटर रस्त्यावर अडकल्याने वाहतूक ठप्प
swt115.jpg
23856
ओटवणे ः येथे रस्त्यावर कँटर अडकल्याने वाहतूक ठप्प झाली.
ओटवणेत कॅंटर रस्त्यावर
अडकल्याने वाहतूक ठप्प
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ११ ः ओटवणे-चराठा मार्गावर सिमेंट वाहतूक करणारा कॅंटर भर रस्त्यावर अडकल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. या अवघड वळणाचा अंदाज न आल्याने, त्यातच गाडीतील मालामुळे ती वळवणे कठीण झाल्यामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. सुदैवाने गाडी पलटी न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली; मात्र या कॅन्टरमुळे पूर्ण रस्ताच बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना पागावाडी-इन्सुली मार्गातून वळवाव्या लागल्यात. उशिरापर्यंत हा कॅंटर रस्त्यावरून बाजूला करण्यात आला नव्हता. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली.
..................
टीपः swt116.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ -
23857
स्वरा वारंग, शंकर राऊळ
आकेरी हुमरस शाळेच्या
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी हेरून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊन मोलाचे योगदान ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळीच्या वतीने करण्यात येत आहे. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका दीप्ती तळवणेकर आणि सर्व पालकांनी कौतुक केले आहे. ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी हुमरस येथील सहावीमधील स्वरा वारंग आणि शंकर राऊळ या दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

