हत्तींच्या उपद्रवात ''बाहुबली''ची भर

हत्तींच्या उपद्रवात ''बाहुबली''ची भर
Published on

swt117.jpg व swt118.jpg
23831
23832
तेरवण ः परिसरात दाखल झालेला बाहुबली टस्कर अंगावर धूळ उडविताना.

हत्तींच्या उपद्रवात ‘बाहुबली’ची भर
काजू हंगामावर संकट; घोटगेत सहा हत्तींचा कळप सक्रिय
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ११ : बाहुबली टस्कराने घाटमाथ्याची हद्द पार करून दोडामार्ग कार्यक्षेत्रात शिरकाव केला आहे. बऱ्याच दिवसांनी त्याची झालेली एंट्री आणि घोटगे गाव परिसरात ठाण मांडून बसलेल्या सहा हत्तींच्या वावराने काजूच्या ऐन हंगामात शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. हत्तींकडून होणाऱ्या आर्थिक नुकसानीत वाढ होत असल्याने यावर्षीच्या काजू हंगामातील नुकसान भरपाई एकरकमी देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सध्या घोटगे परिसरात सहा हत्ती सतत शेती बागायतींचे नुकसान करत असतानाच तिलारी खोऱ्यात तब्बल महिनाभरानंतर ‘बाहुबली’ टस्कराचे पुनरागमन झाले आहे. महाकाय अशा बाहुबलीच्या आगमनाने तिलारी खोऱ्यातील तणाव अधिकच वाढला आहे. मंगळवारी (ता. १०) पहाटे पाचच्या सुमारास बाहुबली टस्कर सोनावल परिसरात दाखल झाला.
सध्या तिलारी खोऱ्यात गणेश टस्कर, ओंकारसह एकूण सहा हत्तींचा कळप सक्रिय आहे. हे हत्ती घोटगे परिसरात मागील काही दिवसांपासून ठाण मांडून आहेत. काजू, केळी तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
गतवर्षीच्या काळात बाहुबली व गणेश टस्कर यांच्या जुंपली होती. त्या संघर्षात बाहुबलीवर गणेशने वर्चस्व मिळविले आणि तेव्हापासून बाहुबली एकटा भ्रमण करीत आहे. गणेश कळपासोबत असून इतर हत्तींची पाठराखण करीत आहे; मात्र यावेळी जर बाहुबली कळपात सामील होण्यासाठी आतुर झाला तर गणेश व बाहुबली यांच्यात वर्चस्वासाठी पुन्हा झुंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर या दोघात टोकाचा संघर्ष झाला तर, अन्य हत्ती भीतीपोटी या परिसरात कोणत्या दिशेने पायपीट करतील, याची कल्पना करणे कठीण बनले आहे.
सध्या काजू हंगाम जोरात चालू असतानाच हत्तींच्या वावराने शेतकऱ्यांना बागेत जाणेही धोकादायक बनले आहे. काजू बागेत जावे की नाही, अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या सुरक्षितेत वाढ करावी. तसेच शेतीचे नुकसान थांबविण्यावरही लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

चौकट
बागायतदार धास्तावले
सध्या काजूचा हंगाम सुरू आहे. दोडामार्ग तालुका जिल्ह्यातील सर्वाधिक काजू उत्पादक म्हणून ओळखला जातो. बहुसंख्य काजू लागवड डोंगरात आहे. गेली काही वर्षे काजू पीक येण्याच्या काळातच हत्तींचा कळप दाखल होत असल्याने बागायतीमध्ये जाणे कठीण बनते. यात बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. तिलारी खोऱ्यासह तळकट, कोलझर परिसरात हत्तींचा हा उपद्रव असतो. आताही त्यांच्या पुनरागमनाने काजू हंगामावर संकट ओढवले आहे.

कोट
सध्या तालुक्यात वावर असलेले सहा हत्ती आणि बाहुबलीच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी हत्ती कोणत्या ठिकाणी आहेत आणि ते कोणत्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत, याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना कळेल. हत्तीग्रस्त भागात हत्तींची चाहूल देणारे सायरन ठिकठिकाणी बसविले आहेत. हत्ती पाच किलोमीटर अंतरावर असला तरी सायरन वाजेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हत्ती कोणत्या दिशेने जात आहे, हे समजेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.
- संभाजी पाटील, वनक्षेत्रपाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com