-चिपळुणात ३४९० मतदारांची नोटाला पसंती

-चिपळुणात ३४९० मतदारांची नोटाला पसंती

Published on

चिपळुणात ३४९० मतदारांची नोटाला पसंती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना नापसंती दर्शवत नोटाला मतदान केले. यामध्ये ९ जिल्हा परिषद गटामध्ये १३६९ तर पंचायत समितीच्या १८ गणात २१२१ मते नोटाला पडली आहेत. यामध्ये पेढे जिल्हा परिषद गट आणि शिरगांव पंचायत समिती गणात नोटाला झालेले मतदान पराभूत उमेदवारांना भारी पडले आहे.
चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. पंचायत समितीसाठी कोणाही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळालेले नाही. पंचायत समितीच्या १८ जागापैकी शिवसेनेला ४, भाजपला ३, राष्ट्रवादी काँग्रेस ७ आणि ठाकरे सेनेला ४ जागा मिळाल्या. या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने ठाकरे सेनेची भूमिका निर्णायक ठरली आहे; मात्र या निवडणुकीत नोटाला झालेल्या मतदानाने मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषदेच्या ९ गटात १३६९ तर पंचायत समितीच्या १८ गणात २१२१ मतदान झालेले आहे. पंचायत समितीला नोटांचे मतदान अधिक आहे. जिल्हा परिषदेसाठी वहाळ गटात तालुक्यात सर्वाधिक मतदान नोटाला झाले. या गटात २३६ मतदारांनी रिंगणात असलेल्या उमेदवारांना नापसंती दर्शवली. पेढे गटात विजयी उमेदवार भाजपच्या दीप्ती महाडीक यांना ४६२२ तर राष्ट्रवादीच्या सान्वी शिंदे यांना ४४३१ मते मिळाली. महाडीक या १९१ मतांनी विजयी झाल्या. या गटात नोटाला १५६ मते पडली आहे, त्यामुळे येथे नोटाला झालेल्या मतांनी लक्ष वेधले आहे. पंचायत समितीसाठी तालुक्यात सर्वाधिक नोटाला मतदान पिंपळी खुर्द गणात झाले. या मतांनी तेथील उमेदवारांचे गणित बिघडलेले नाही; मात्र शिरगांव गणात नोटाला झालेल्या मतांनी मात्र गणित बिघडले आहे. शिरगांव गणातून राष्टवादीच्या स्नेहा साळवी यांना ३३०५ मते तर विरोधी भाजपच्या अॅड. नयना पवार यांना ३१७० मते मिळाली. परिणामी, साळवी या १३५ मतांनी विजयी झाल्या. या गणात नोटाला १६४ मतदान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com