विद्याताईंचा कौतुक सोहळा
-rat११p४.jpg-
२६O२३७८५
रत्नागिरी : संघमित्रा सेवा प्रतिष्ठानचा सिंधू सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्या पटवर्धन यांचा सत्कार करताना राष्ट्रसेविका समितीच्या जिजामाता शाखेच्या महिला सदस्य.
---------
विद्या पटवर्धन यांना ‘सिंधू सन्मान’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका विद्या पटवर्धन यांना यावर्षी नागपूरच्या संघमित्रा सेवा प्रतिष्ठानचा सिंधू सन्मान पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल रत्नागिरीच्या राष्ट्रसेविका समितीच्या जिजामाता शाखेतर्फे त्यांचा कौतुक सोहळा साजरा झाला.
सुरूची उद्योगकेंद्राच्या संस्थापक सदस्या, रेणुका प्रतिष्ठानच्या संस्थापक सदस्या, गेली जवळपास ४८ वर्ष अग्निहोत्राचे व्रत करत इदं न मम् असा वसा जपणाऱ्या विद्याताई सुपरिचित आहेत. संघकार्यात व अग्निहोत्रासाठी जीवनभर झटणारे (कै.) मधूभाऊ यांच्या त्या पत्नी. मधुभाऊंच्या निधनानंतर तेवढ्याच निष्ठेने त्या हे व्रत करत आहेत. समितीच्या पहिल्या प्रचारिका सिंधुताई यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार विद्या पटवर्धन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्या हस्ते नागपुरात देण्यात आला. विद्याताईंचे औक्षण करण्यात आले. अर्चना वैशंपायन यांनी वैयक्तिक गीत सादर केले. उमा दांडेकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. मानसी डिंगणकर यांनी मानपत्राचे वाचन केले. वेदिका मुळ्ये यांनी स्वागत, सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

