भाजपाचे महिला संमेलन उत्साहात
-rat११p७.jpg-
२६O२३८१५ (पेस्टेड)
रत्नागिरी : केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार अभियानाअंतर्गत भाजप कार्यालयात आयोजित महिला संमेलनात मार्गदर्शन करताना सीए मुग्धा करंबेळकर.
--------
भाजपचे महिला संमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : केंद्रीय अर्थसंकल्प प्रचारप्रसार अभियानाअंतर्गत भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात महिला कार्यकर्त्यांचे संमेलन यशस्वीरीत्या पार पडले. या संमेलनाच्या प्रमुख वक्त्या म्हणून सीए मुग्धा करंबेळकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
या वेळी प्रमुख वक्त्या मुग्धा करमळकर यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचा महिलांना कसा फायदा होऊ शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. हे संमेलन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.
या वेळी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील महिला, स्वयंरोजगार, बचतगट, स्टार्टअप् आणि आर्थिक सबलीकरणासंबंधी विविध योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, नगरसेविका मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, महिला मोर्चाच्या मंडळ अध्यक्ष सुचिता नाचणकर, स्नेहा चव्हाण व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

