दाभोळमध्ये साधना महाजन यांची विजयी मिरवणूक

दाभोळमध्ये साधना महाजन यांची विजयी मिरवणूक

Published on

-rat११p२०.jpg-
२६O२३८३८
दापोली ः दाभोळमध्ये विजयी उमेदवार साधना महाजन यांचे महिलांनी जंगी स्वागत केले.
--------
दाभोळमध्ये साधना महाजन यांचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ११ ः दापोली तालुक्यातील दाभोळ जिल्हा परिषद गटात साधना मिहीर महाजन यांनी ७ हजार ४५३ मते मिळवत ३ हजार १५८ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. भाजपकडून एबी फॉर्म न मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेत उमेदवारी स्वीकारली होती. भाजपच्या स्मिता जावकर यांना ४ हजार २६५ मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत शिवसेनेने वर्चस्व राखले. विजयाबद्दल परिसरात मिरवणूक काढण्यात आली. पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन मेहनत घेतली. त्यांच्या परिश्रमामुळेच मला एवढे मताधिक्य मिळाले. या विजयाचे श्रेय मी पक्ष नेतृत्व, कार्यकर्ते आणि माझ्या कुटुंबीयांना देते, असे साधना महाजन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com