

swt1111.jpg
23847
प्राजक्त चव्हाण
बांधकाम कामगारांना
संच वाटपाचे आदेश
मंत्र्यांकडून दखल ः संघटनेतर्फे चव्हाण यांनी वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः कामगारांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक कामगार संघटनेने मंत्रालयात कामगार मंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मुख्य पाच मागण्यांमधील दोन मागण्या तत्काळ पूर्ण केल्या आहेत. त्यात अत्यावश्यक संच मिळण्यासाठी तत्काळ संबंधित यंत्रणेला फोन करून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली.
श्री. चव्हाण यांनी मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन बांधकाम कामगारांच्या मागण्यांविषयी लेखी निवेदन देऊन चर्चा केली. त्यातील अत्यावश्यक संच मिळण्यासाठी तत्काळ संबंधित यंत्रणेला फोन करून सुरू करण्याच्या सूचना दिल्या व त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून संच वाटपास ऑनलाईन नावनोंदणी घेण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या अनेक मागण्या अजून प्रलंबित आहेत. त्यातील मुख्य काही मागण्यासाठी मंत्रालयामध्ये कामगार मंत्री फुंडकर, पालकमंत्री नीतेश राणे यांचे कार्यालय तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून बोनाफाईड व ७५ टक्के उपस्थिती छापील दाखला मिळण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ''जंजिरा'' या शासकीय निवासस्थानी व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये छापील दाखले नसल्यामुळे अपूर्ण व चुकीची माहिती दिली जाते. त्यामुळे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या लाभासाठी केलेला अर्ज रद्द करण्यात येतो व कामगार लाभापासून वंचित राहतो. त्यामुळे मोठ्या विद्यालयांप्रमाणे छापील दाखले तयार करावे, जेणेकरून सर्व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल, अशी मागणी केली आहे. मागील वर्षी शिकत असलेल्या एकूण उपस्थिती ७५ टक्के आहे, त्याचा उपस्थिती दाखला मिळावा. दाखल्यावर विद्यार्थी नाव, मागील वर्षाची इयत्ता, मागील शैक्षणिक वर्ष व एकूण उपस्थिती किती टक्के आहे, त्याची माहिती असावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दाखले छापील तयार करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.