वधू-वर, पालक मेळाव्यास सिंधुदुर्गनगरी येथे प्रतिसाद
swt1112.jpg
23854
सिंधुदुर्गनगरी ः वधू-वर पालक मेळाव्याचे उद्घाटन करताना अरविंद वळंजू, सूर्यकांत कदम, मोहन जाधव, मिलिंद जाधव, आनंद धामपूरकर व इतर मान्यवर.
वधू-वर, पालक मेळाव्यास
सिंधुदुर्गनगरी येथे प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्था सिंधुदुर्ग यांनी दरवर्षीप्रमाणे बौद्ध समाजातील तरुण-तरुणींना अनुरूप वधू-वर निवडता यावा. यासाठी डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित केलेल्या वधू-वर मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्याचे उद्घाटन तथागत नागरी पतसंस्थेचे चेअरमन तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम व मान्यवरांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आले.
त्रिशरण पंचशील म्हणून संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. ममता जाधव यांनी बुद्ध धम्मगीत सादर केले. यावेळी संस्थेचे सचिव मिलिंद सरपे, मिलिंद जाधव, माजी सचिव मोहन जाधव, आनंद धामापूरकर, आनंद सावळे, श्रद्धा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा कदम, व ममता जाधव यांनी केले. आभार आनंद धामापूरकर यांनी मानले. यावेळी सुमारे ५० वधू-वर पालकांनी नोंदणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

