चिपळुणात १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

चिपळुणात १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

Published on

चिपळुणात १३ उमेदवारांची अनामत जप्त
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील एकूण १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषद गटातील ५ तर पंचायत समिती गणातील ८ उमेदवारांचा समावेश आहे. यात विशेष म्हणजे काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराची अनामत वाचू शकलेली नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील ३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याने आमदार शेखर निकमांना मोठा फटका बसला आहे.
जिल्हा परिषद गटात वंचितच्या गीता जाधव (कळवंडे गट), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमिता मोडक (शिरगाव), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नीलेश अनंत चव्हाण (उमरोली), अपक्ष उमेदवार योगेश यशवंत खांडेकर (उमरोली), बसपाचे विकास भागोजी डिके (कोकरे) यांचा समावेश आहे. पंचायत समिती गणात काँग्रेसच्या मुमताज दलवाई (कळवंडे गण), ठाकरे सेनेचे महेश महाडिक (पेढे), ठाकरे सेनेचे विलास तांदळे (अलोरे), अपक्ष फैसल सय्यद (वेहळे), ठाकरे सेनेचे सागर सावंत (सावर्डे), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सायली बंगाल (गुढे), बसपाचे बुद्धदास सकपाळ (वहाळ), अपक्ष उमेदवार अर्चना रसाळ (कुटरे) यांचा समावेश आहे. अनामत रक्कम वाचवण्यासाठी एकूण झालेल्या वैध मतांच्या एक अष्टमांश मते घेणे आवश्यक असते. ती न मिळाल्याने १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com