जनजागृती संस्थेतर्फे सावी मुद्राळेचा गौरव
swt1116.jpg
23872
कासार्डे ः सावी मुद्राळे हिचा जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
जनजागृती संस्थेतर्फे
सावी मुद्राळेचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ११ : कासार्डे माध्यमिक विद्यालयात सहावीमध्ये शिकत असलेली सावी मुद्राळे हिने मिळविलेल्या देश पातळीवरील यशाबद्दल जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने घरी जाऊन विशेष सन्मान करण्यात आला. तिने भारत सरकारच्या प्रोजेक्ट वीरगाथा ५.० मध्ये देशातील पहिल्या १०० मध्ये दहावे स्थान पटकावले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि भगवद्गीता देऊन सन्मानित करण्यात आले. जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, अभिनेत्री अक्षता कांबळे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सत्यवान धुमाळे, संचालक विजय देसाई, संदेशपत्र संग्राहक निकेत पावसकर, चित्रकार अक्षय मेस्त्री, श्रावणी कॉम्प्युटरच्या संस्थापिका श्रावणी मदभावे, अनिल कांबळी, गंधाली तिरपणकर आदी उपस्थित होते. यावेळी विधी मुद्राळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

