वडदहसोळमधील मॅरेथॉन स्पर्धेत श्रुती, हर्ष, विजय विजयी

वडदहसोळमधील मॅरेथॉन स्पर्धेत श्रुती, हर्ष, विजय विजयी

Published on

-rat११p२४.jpg-
२६O२३८८५
राजापूर ः मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस देऊन गौरवताना सुवर्णपदक विजेत्या साईशा पवार आणि मान्यवर.
--------
मॅरेथॉन स्पर्धेत श्रुती, हर्ष, विजय अव्वल
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः तालुक्यातील वडदहसोळ येथील स्व. लक्ष्मीबाई उमाजी पळसमकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांचा नातू योगेश पळसमकर यांनी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुले, मुली, लहान मुले, पुरुष-महिला अशा तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये श्रुती शिंदे, हर्ष चव्हाण, विजय पळसमकर यांनी आपापल्या गटांमध्ये विजेतेपद पटकावले. त्यांच्यासह अन्य विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
या वेळी सरपंच विजय घाडये, तायक्वांदो खेळातील सुवर्णपदक विजेत्या साईशा पवार, राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय कबड्डी पंच मोहन पाडावे, डॉ. अक्षय म्हादये, गावकर उमाजी पळसमकर, गंगाराम म्हादये, भानू गितये, पांडुरंग म्हादये आदी उपस्थित होते.
मुलींच्या गटामध्ये श्रुती शिंदे, प्राप्ती तरळ, सारा गाडे, नियती बाणे, साक्षी मांडवकर यांनी तर मुलांच्या गटामध्ये हर्ष चव्हाण, आयुष्य मटकर, ओमकार भेरे, आर्यन जोगले, देवेन सुद, लहान मुले व मुली गटामध्ये अथर्व गोंडाळ, स्वराज धनावडे, आयुष पळसमकर, विधी पळसमकर, सोनाक्षी पळसमकर, मनस्वी पळसमकर तर, पुरुष व महिला गटामध्ये विजय पळसमकर, संदीप पळसमकर, विजय घाडये, दीप्ती गोंडाळ, संपदा पळसमकर, प्रतीक्षा पळसमकर यांनी क्रमांक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com