नंदकेश्वर कीर्तनवाडीला विजेतेपद

नंदकेश्वर कीर्तनवाडीला विजेतेपद

Published on

-rat११p२७.jpg-
२६O२३८९५
गुहागर ः क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या नंदकेश्वर संघाला चषक प्रदान करताना मान्यवर.
-----
नंदकेश्वर कीर्तनवाडीला विजेतेपद
गुहागरातील क्रिकेट स्पर्धा ; ३० संघाचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ११ ः येथील श्री संताजी संग्राम तेलीआळी गुहागर यांच्यावतीने एक वाडी एक संघ या अभिनव संकल्पनेवर भव्य दिव्य नाईट अंडरआर्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गुहागर शहरातील ३० संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे विजेतेपद नंदकेश्वर कीर्तनवाडी संघाने तर उपविजेतेपद यजमान श्री संताजी संग्राम तेलीआळी संघाने पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन चंद्रकांत झगडे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगराध्यक्षा नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, नगरसेवक समीर बागकर, सौरभ भागडे, नगरसेविका विदीशा दणदणे, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, माजी सभापती राजेश बेंडल, जयदेव मोरे, सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे साहिल आरेकर, राज विखारे, संतोष वरंडे, तेली समाजसेवा संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. विजेत्या संघाला १० हजार १११ रुपये आणि उपविजेत्या संघाला ५ हजार ५५५ रुपये आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ऋषिकेश रहाटे, प्रशांत प्रभाकर रहाटे, स्वप्नील राऊत, राकेश राऊत, रोशन यादव, प्रकाश रहाटे तसेच त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com