कुडाळात १२ जुलैला ''मॉन्सून रन २०२६''
swt126.jpg
24049
कुडाळ ः ‘मॉन्सून रन २०२६’ रजिस्ट्रेशन लिंक अनावरणप्रसंगी डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, प्रमोद भोगटे, डॉ. सई राणे, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. प्रशांत मडव व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळात १२ जुलैला ‘मॉन्सून रन २०२६’
‘हाफ मॅरेथॉन’ ः सहभागाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः हिंदू कॉलनी येथील राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ तसेच टीम कुडाळ मॉन्सून रन यांच्यावतीने सलग तिसऱ्या वर्षी १२ जुलैला ‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ या भव्य हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन येथे केले आहे. ही मॅरेथॉन ५, १०, १६ आणि २१ किलोमीटर अशा विविध गटांत होणार आहे. सिंधुदुर्गसह मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी आदी ठिकाणांहून धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.
या मॅरेथॉन स्पर्धेच्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण येथील मराठा समाज हॉलच्या सभागृहात आज ‘लोहपुरुष’, व्यावसायिक प्रमोद भोगटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, गजानन कांदळगावकर, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. प्रशांत मडव, डॉ. जयसिंग रावराणे, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर, रुपेश तेली, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, डॉ. गिरीश बोर्डवेकर, डॉ. सोमनाथ परब, डॉ. सई राणे, डॉ. अनघा बोर्डवेकर, डॉ. शुभांगी जोशी, सुजाता रासकर, सोनाली पालव आदींसह मॉन्सून रनची टीम उपस्थित होती.
यावेळी श्री. भोगटे यांचा टीम कुडाळ मॉन्सून रनच्या वतीने सत्कार करण्यात आला. ही मॅरेथॉन कुडाळ एमआयडीसी मधील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिसरातून सुरू होणार आहे. ‘सुदृढ राष्ट्र’ या संकल्पनेतून या मॅरेथॉनचे आयोजन केले असल्याचे डॉ. जी. टी. राणे, अजित राणे व सहकाऱ्यांनी सांगितले. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम दोन विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

