जयवंत चव्हाण यांचे राज्यस्तरीय यश
-rat१२p२.jpg-
२६O२४०१६
जयवंत चव्हाण
----
जयवंत चव्हाणांचे
राज्यस्तरीय यश
दापोली ः येथील युवा कवी व लेखक जयवंत चव्हाण यांनी विविध काव्य व साहित्य स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे. विश्वसमता कलामंच, संगमेश्वर आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ५० कवींनी सहभाग घेतला होता. चव्हाण यांच्या कवितेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना ‘सुनील स्मृती राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. आकर्षक मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. हा पुरस्कार वितरण समारंभ १५ फेब्रुवारीला संगमेश्वर-लोवले येथे होणार आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित काव्यलेखन स्पर्धेत खुल्या गटात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच निबंधलेखन स्पर्धेतही खुल्या गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान २७ ला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रामराजे महाविद्यालयात होणार आहे.
बी. के. गोंडाळ यांची
उद्या शोकसभा
राजापूर ः शहरानजीकच्या शीळ येथील ज्ञानसागर वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष व जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बी. के. गोंडाळ यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांची शोकसभा शनिवारी (ता.१४) दुपारी ३.३० वा. शीळ येथे ज्ञानसागर वाचनालय सभागृहात होणार आहे. सभेत त्यांना श्रद्धाजली वाहण्यात येणार आहे. त्यांच्या मित्रपरिवार, सहकारी, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्ञानसागर वाचनालय, सर्वोदय प्रतिष्ठान आणि शीळ ग्रामस्थांनी केले आहे.
पोचरी-धामणेवाडीत
उद्यापासून क्रिकेट स्पर्धा
रत्नागिरी ः पोचरी-धामणेवाडी (ता. संगमेश्वर) येथील श्री शिमरादेवी ग्रामविकास मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शनिवारपासून (ता. १४) ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. पोचरी ग्रामपंचायतीच्या पाठीमागील मैदानावर सामने होतील. विजेत्या संघास व उपविजेत्या संघास रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सामनावीर आणि मालिकावीर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. संघांनी श्री शिमरादेवी ग्रामविकास मंडळाशी संपर्क साधावा.

