महाशिवरात्रोत्सावा सुरुवात
महाशिवरात्रोत्सवाला
धूतपापेश्वरात सुरुवात
राजापूर ः राजापुरातील ऐतिहासिक आणि असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री धूतपापेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्रोत्सवाला सुरुवात (ता.१२) झाली. हा उत्सव १८ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.१५) महाशिवरात्र यात्रोत्सव साजरा होणार आहे. या दिवशी पहाटे ३ वा. नित्यपूजा, श्रींवर रूद्राभिषेक, सकाळी ९ वा. गुजराळी येथील शामला कुलकर्णी यांचे भजन, १० वा. सुरस्नेह भजनी मंडळ, पुणे, दुपारी १२ वा. हभप नरहर दामोदर करंबेळकर, कणकवली, २ वा. गिरीश वारे यांचा संगीत कार्यकम, ३ वा. दर्पण कांबळी, श्री समर्थ प्रासादिक भजन मंडळ यांचे भजन, सायं. ४ वा. समर्थ महिला भजन मंडळ, भटाळी यांचे भजन, ७ वा. स्थानिक भजनांचा कार्यक्रम, १३ला पहाटे ३ वा. श्रींची महापूजा, महानैवेद्य, ५ वा. भोवती असे कार्यकम होणार आहेत. तर, १२ ते १८ फेब्रुवारी या उत्सवकाळात दररोज सकाळी ६ वा. पारंपरिक वाद्य, ६.३० वा. नित्यपूजा, श्रींवर रूद्राभिषेक, दुपारी २ ते ४ शयनकाल, सायं.७.३० वा. गायन, रात्री ८ वा. कीर्तन, १० वा. भोवती, ११.३० वा. आरती असे कार्यक्रम होणार आहेत. १९ला महाप्रसाद होईल.
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत
जरियान आराईचे यश
दापोली ः सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दापोलीच्या जरियान फारूक आराईने उल्लेखनीय कामगिरी करत १७ वर्षांखालील वयोगटातील ८३ किलो वजनगटात द्वितीय क्रमांक पटकावला. त्याने स्क्वॉटमध्ये १२० किलो, बेंचप्रेसमध्ये ७५ किलो आणि डेडलिफ्टमध्ये तब्बल १६७.५ किलो वजन उचलले. एकूण ३६२.५ किलो वजनाची यशस्वी नोंद करत त्याने उपविजेतेपद मिळवले. त्याच्या दमदार कामगिरीने उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली. या यशामागे शिक्षक व प्रशिक्षक अशफाक मुस्तफा खान यांचे मार्गदर्शन, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

