सुंदर हस्ताक्षरासाठी नियमित सराव आवश्यक
-ratchl६२.jpg-
२६O२९००७
चिपळूण ः सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी.
---
सुंदर हस्ताक्षरासाठी नियमित सराव आवश्यक
अनिल कडव ः पाग विद्यालयात ‘सकाळ’तर्फे स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः सुंदर हस्ताक्षर म्हणजे केवळ अक्षर सुंदर असणे नाही, तर ते स्वच्छ, स्पष्ट आणि वाचण्यास सोपे असणे महत्त्वाचे आहे. दररोज थोडा वेळ सुंदर अक्षरांचा सराव करावा, वहीत ओळीमध्ये लिहिण्याचा सराव केल्यास अक्षर सुधारते. सुंदर अक्षर येण्यासाठी विद्यार्थ्यांनी अक्षरांची रचना, ओळींचा समतोल आणि लिहिण्यात स्वच्छता ठेवावी, असे प्रतिपादन पाग येथील माध्यमिक महिला विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल कडव यांनी केले.
‘सकाळ’ माध्यम समुहाच्यावतीने समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. महिला, विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी सातत्याने विधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सुंदर हस्ताक्षर लिहिण्यास चालना मिळावी या हेतूने चिपळूण-पाग येथील महिला विद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये आठवी आणी नववीतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मुख्याध्यापक अनिल कडव म्हणाले, विद्यार्थ्यांनी अक्षरांची रचना करताना प्रत्येक अक्षर स्पष्ट व नीट लिहावे. अक्षरांचे आकार समान ठेवावेत. खूप मोठे किंवा खूप छोटे अक्षर टाळावे. ओळींचा समतोल साधताना अक्षरे ओळींच्या सरळ रेषेत लिहावीत. शब्दांमध्ये योग्य अंतर ठेवावे. खोडाखोड किंवा शाईचे डाग टाळावेत. अक्षरे नीट आणि स्पष्ट दिसतील याची काळजी घ्यावी. यावेळी सहायक शिक्षक प्रमोद महाडीक, संजाली सावंत, ‘सकाळ’चे सहाय्यक वितरण व्यवस्थापक पांडुरंग साळवी, बातमीदार नागेश पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

