

29995
विविध योजना ग्रामस्थांच्या दारी
महाराजस्व अभियानास चौकेत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० : राज्याच्या महसूल व वन विभागाच्यावतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिरांचे आयोजन ठिकठिकाणी केले आहे. याच अनुषंगाने पहिला टप्पा मालवण तालुक्यातील आंबेरी मंडळ विभागात, चौके येथील बॅ. नाथ पै (चव्हाण) महाविद्यालयात मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, वायरी-भूतनाथ जिल्हा परिषद सदस्य अक्षता गावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, चौके हायस्कूल स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, जिल्हा विस्तार अधिकारी शिंगाडे, संजय गांधी निराधार शाखाप्रमुख प्रिया हर्णे, नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, तलाठी संघटना अध्यक्ष अजय परब, पंचायत समिती विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, चौके सरपंच पी. के. चौकेकर, नांदरुख सरपंच रामचंद्र चव्हाण, आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर, आमडोस सरपंच सुबोधिनी परब, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेंबुलकर, साळेल सरपंच रवींद्र साळकर, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, धामापूर सरपंच मानसी परब, कुणकावळे सरपंच मंदार वराडकर, देवली सरपंच श्याम वाक्कर, चौके हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रसिका गोसावी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता गावडे आणि पापा माडलकर यांचीही उपस्थिती होती.
याप्रसंगी महसूल, कृषी आणि आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी आपापल्या विभागांतील शासकीय योजनांची माहिती आंबेरी मंडळातील ग्रामस्थांना दिली. उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, डॉ. कुबेर मिठारी, तालुका कृषी अधिकारी धनंजय गावडे, विनायक जांभेकर व विविध सरपंचांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
---
योजनांचा लाभ मिळावा म्हणून शिबिर!
तहसीलदार लव्हे म्हणाले, ‘‘शासनाच्या विविध योजनांचा १०० टक्के लाभ ग्रामस्थांना मिळावा, यासाठी प्रशासनाने हे शिबिर तुमच्या गावात आणले आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा आणि गावाचा विकास साधावा, जेणेकरून देशाच्या विकासाला हातभार लागेल. विविध दाखल्यांसाठी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची वेळेत पूर्तता केल्यास सर्व विभागांकडून तातडीने सहकार्य मिळेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.