

बँक ऑफ इंडियातर्फे
मेगा समझोता अभियान
रत्नागिरी ः देशभरातील आपल्या सर्व शाखा आणि झोन स्तरावर थकीत कर्ज खात्यांच्या तडजोडीसाठी १६ ते २० मार्च २०२६ दरम्यान ‘मेगा समझोता अभियान’ आयोजित केले आहे. ज्या कर्जदारांना व्यवसायातील अडचणी, वैद्यकीय कारणे किंवा अन्य अपरिहार्य कारणांमुळे कर्जाची वेळेत परतफेड करता आली नाही, त्यांच्यासाठी ही विशेष संधी आहे. बँकेने एनपीए झालेल्या लहान आणि मध्यम आकाराच्या कर्ज खात्यांसाठी विशेष ''वन टाईम सेटलमेंट'' योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत पात्र कर्जदारांना थकीत रकमेत आकर्षक सवलती देण्यात येणार असून, त्यांना सन्मानाने कर्जमुक्त होता येईल. ज्या सर्व कर्जदारांची खाती एनपीए आहेत, त्यांनी या पाच दिवसांच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली कर्ज खाती सेटल करावीत, असे आवाहन बँक ऑफ इंडिया प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.