रत्नागिरी परिमंडलात 18 कोटी 66 लाखांची वीजबिल थकबाकी

रत्नागिरी परिमंडलात 18 कोटी 66 लाखांची  वीजबिल थकबाकी
Published on

रत्नागिरीत १८ कोटींची वीजबिल थकबाकी
१ लाख १८ हजार २३७ ग्राहक ; २ हजार ५१८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख १८ हजार २३७ ग्राहकांकडे १८ कोटी ६६ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत २ हजार ५१८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यामध्ये रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती १ लाख १ हजार २९२ ग्राहकांकडे ९ कोटी ४१ लाख, व्यावसायिक १० हजार ५६६ ग्राहकांकडे ३ कोटी ६५ लाख, औद्योगिक १ हजार ५४८ ग्राहकांकडे ३ कोटी १० लाख, सार्वजनिक सेवा ४ हजार ५२० ग्राहकांकडे २ कोटी २७ लाख आणि इतर वर्गवारीतील ३११ ग्राहकांकडे २५ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभागात २८ हजार ७२६ ग्राहकांकडे ३ कोटी ७६ लाख, चिपळूण विभागात १३ हजार ७७८ ग्राहकांकडे २ कोटी ६ लाख, खेड विभागात १५ हजार ६८० ग्राहकांकडे २ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील १ हजार ७२१ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात २७ हजार ६३१ ग्राहकांकडे ४ कोटी ७१ लाख, कुडाळ विभागात ३२ हजार ४२२ ग्राहकांकडे ५ कोटी ६४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील ७९७ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे.
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीजबिल भरणा सूट दिली जाते. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
---
सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरू
थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च २०२६ अखेरपर्यंत शनिवारी , रविवारी व सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com