करसल्लागार असोसिएशनचे निवेदन

करसल्लागार असोसिएशनचे निवेदन

Published on

-rat१४p१.jpg-
P२६O३०७७१
रत्नागिरी : राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त संदीप माने यांना रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशनतर्फे निवेदन देताना रमाकांत पाथरे, अभिजित पटवर्धन, रवींद्र साळवी, अभिजित बेर्डे आदी.
--

‘महाजीएसटी’तील अडचणी दूर करा
करसल्लागार असोसिएशनचे निवेदन ; मुदत वाढवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : महाराष्ट्र राज्य सरकारने व्हॅट व व्यवसाय करासाठी ऑक्टोबर २०२५ पासून महाजीएसटी नवीन संकेतस्थळ चालू केले आहे. या संकेतस्थळावरून नवीन नोंदणीसाठी अर्ज करणे, नवीन प्रोफाइल तयार करणे त्यासाठी येणारे ओटीपी वेळेत न येणे, संकेतस्थळ बऱ्याचवेळा उपलब्ध नसणे, विवरणपत्रके दाखल करण्यासाठी युटीलिटी दिलेली नसणे, जुन्या संकेतस्थळावरील माहिती (विवरणपत्रके, कर भरल्याची चलने) उपलब्ध नसणे अशा अनेक तांत्रिक अडचणींबाबत करसल्लागार असोसिएशनतर्फे राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.
करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य वस्तू व सेवा कर कार्यालयात उपायुक्त संदीप माने यांची भेट घेऊन महाजीएसटी पोर्टलवर येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. विशेषतः व्हॅट तसेच व्यवसाय कर देयक व परतावे भरण्याच्या प्रक्रियेत करदात्यांना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले. संकेतस्थळावरील तांत्रिक समस्यांमुळे करदात्यांना वेळेत परतावे दाखल करण्यात अडथळे येत असल्याने संबंधित मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली.
असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत पाथरे, उपाध्यक्ष सीए अभिजित पटवर्धन, सचिव अ‍ॅड. रवींद्र साळवी, सदस्य अ‍ॅड. अभिजित बेर्डे, अ‍ॅड. उज्ज्वल बापट, राजेश गांगण, अ‍ॅड. नीलेश भिंगार्डे , सीए चैतन्य वैद्य आणि दिनकर माळी उपस्थित होते. व्यवसाय कर विभागाच्या अधिकारी शिंदे या वेळी उपस्थित होत्या. उपायुक्त माने यांनी असोसिएशनचे निवेदन स्वीकारून संबंधित समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले.

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com