मुंबई- मडगाव दरम्यान साप्ताहिक ‘समर स्पेशल’
मुंबई- मडगाव दरम्यान
साप्ताहिक ‘समर स्पेशल’
‘कोरे’ मार्गावर एप्रिलपासून नियोजन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ : कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुटीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई आणि मडगाव दरम्यान साप्ताहिक ‘समर स्पेशल’ गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत या गाड्या धावतील.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या प्रमुख गाड्या अशा: मुंबई सीएसएमटी-मडगाव-मुंबई सीएसएमटी साप्ताहिक स्पेशल गाडी क्र. ०११७१: मुंबई सीएसएमटीहून दर गुरुवारी (१६ एप्रिल ते ११ जून) मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगावला पोहोचेल. गाडी क्र. ०११७२ : मडगावहून दर गुरुवारी (१६ एप्रिल ते ११ जून) सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. याला एकूण २२ डबे आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-मडगाव-एलटीटी साप्ताहिक स्पेशल गाडी क्र. ०१११९ : ‘एलटीटी’हून दर शुक्रवारी (१७ एप्रिल ते १२ जून) मध्यरात्री १२.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगावला पोहोचेल. गाडी क्र. ०११२०: मडगावहून दर शुक्रवारी (१७ एप्रिल ते १२ जून) सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:३० वाजता एलटीटीला पोहोचेल. याला २१ डबे असून दोन्ही गाड्यांसाठी दादर (फक्त सीएसएमटी गाडीसाठी), ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी हे थांबे आहेत.
..................
आरक्षण कधी सुरू होणार?
गाडी क्रमांक ०११७२ आणि ०११२० साठीचे आरक्षण १७ मार्चपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर सुरू होईल. अधिक माहितीसाठी प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला माहिती उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

